Longest Train In The World : तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल आणि खूप ट्रेन तुमच्या समोरून गेल्या असतील. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला ट्रेनचे डब्बे मोजता येतील. एका सामान्य ट्रेनमध्ये जवळपास १६-१७ डब्बे असतात. काही ट्रेनच्या डब्ब्यांची संख्या २०-२५ पर्यंत असू शकते. परंतु, आज आम्ही तुम्हाला अशा ट्रेनबाबत सांगणार आहोत, ज्याबद्दल तु्म्हाला कदाचीत माहित नसेल. या ट्रेनमध्ये एव्हढे डब्बे आहेत, ज्यांना मोजणं कठीण वाटू शकतं. या ट्रेनच्या दोन्ही टोकापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ७.३ किमीचा प्रवास करावा लागेल. ही ट्रेन जगातील सर्वात लांब ट्रेन आहे. या ट्रेनची लांबी २४ आयफिल टॉवर इतकी आहे. या ट्रेनमध्ये शंभर दोनशे नाही तर ६८२ डब्बे आहेत.
लांबी आणि वजनात होती सर्वात पुढे
या शानदार ट्रेनचं नाव ‘द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयरन ओर’ असं आहे. ही ट्रेन एक मालगाडी आहे आणि २१ जून २००१ पहिल्यांदा चालवण्यात आली होती. या ट्रेनने फक्त लांबी नाही तर सर्वात जास्त वजन नेण्यातही अव्वल स्थान गाठलं आहे. या ट्रेनची एकूण लांबी ७.३ किमी इतकी होती आणि या ट्रेनमध्ये एकूण ६८२ डब्बे होते. या ट्रेनला खेचण्यासाठी ८ डिझेल लोकोमोटिव इंजिनची आवश्यकता होती. ही ट्रेन ऑस्ट्रेलियाच्या यांडी माईनहून पोर्ट हेडलॅंडमध्ये जात होती. या प्रवासाचं अंतर २७५ किमी आहे. या ट्रेनने १० तासांत हा प्रवास पूर्ण केलाय. या ट्रेनमध्ये ८२००० टन लोखंड आणि सामान होतं. या ट्रेनचं वजन जवळपास एक लाख टन इतकं होतं.
नक्की वाचा – इंडियन कोब्रा आणि किंग कोब्रा…कोणता साप जास्त खतरनाक? जाणून घ्या दोन्ही सापांमधील फरक
खासगी रेल्वे लाईन
‘द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयरन ओर’ एक खासगी रेल्वे लाईन आहे, जी या ट्रेनला सांचालित करते. याला ‘माऊंट न्यूमैन रेल्वे’ही म्हटलं जातं. या रेल्वे नेटवर्कला लोखंड नेण्यासाठी डिजाईन केलं आहे. ही ट्रेन आजही सुरु आहे, परंतु आता या ट्रेनच्या डब्ब्यांची संख्या कमी झाली आहे. यामध्ये आता २७० डब्बे आहेत. ज्यांना खेचण्यासाठी चार डीझेल लोकोमोटिव इंजिन लागतात. या ट्रेनने दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात लांब असलेल्या ट्रेनचा विक्रम मोडला होता. या ट्रेनला ६६० डब्बे बसवण्यात आले होते.