लग्नाचा हंगाम असो किंवा सामान्य दिवस असो, महिलांना दागिने घालायला प्रचंड आवडतात. प्रत्येक ड्रेससोबत त्यांच्याकडे मॅचिंग ज्वेलरी असलीच पाहिजे. यासाठी त्या संपूर्ण बाजारात फिरतात. पण आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही ज्वेलरी मार्केटबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या मॅचिंग ड्रेसनुसार एकापेक्षा एक शानदार दागिने अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया..
जनपथ आहे पहिल्या क्रमांकावर..
दिल्लीतील जनपथ मार्केटमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक दागिने मिळतील. येथे तुम्ही १०-२० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत अनेक दागिने खरेदी करू शकता. कॉस्च्युम ज्वेलरी असो किंवा टेंपल ज्वेलरी किंवा ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी असो, सगळ्याच गोष्टी इथे अगदी कमी किमतीत मिळतात.
कमर्शियल स्ट्रीट बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर आहे
कमर्शियल स्ट्रीट, बंगळुरू हे देशातील सर्वात मोठ्या कृत्रिम दागिन्यांपैकी एक आहे. येथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आर्टिफिशियल ज्वेलरी खरेदी करू शकता. या दागिन्यांच्या बाजारातून तुम्ही स्वस्त दागिने तसंच महागातले महाग दागिने खरेदी करून ते तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. मात्र याठिकाणी एवढी गर्दी असते की अनेक वेळा शॉपिंग करायला तासन् तास लागतात.
बेगम बाजार तिसऱ्या क्रमांकावर आहे..
बेगम बाजार हैदराबाद येथे आहे. असे मानले जाते की पुरातन दागिन्यांच्या बाबतीत, या बाजारपेठेला तोड नाही. येथे तुम्हाला आर्टिफिशियल ज्वेलरी तसेच रिअल गोल्ड डायमंड ज्वेलरी अगदी आरामात मिळेल. तुम्ही जर प्राचीन दागिन्यांचे शौकीन असाल तर हे मार्केट तुमच्यासाठी योग्य आहे.
( हे ही वाचा: सर्व रेल्वे रुळांवर दगड टाकले जातात पण रेल्वे स्टेशनजवळ का नाही? यामागचे कारण जाणून थक्क व्हाल)
सरोजिनी नगर चौथ्या क्रमांकावर आहे..
सरोजिनी नगर हे देशाची राजधानी दिल्लीत आहे. सरोजिनी नगर बाजारपेठ घाऊक खरेदीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला दागिने तसेच सर्व प्रकारच्या वस्तू अतिशय स्वस्त दरात मिळतील. विशेषत: महिलांशी संबंधित उत्पादने येथील बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जातात.
जोहरी मार्केट पाचव्या क्रमांकावर आहे..
जोहरी बाजार हे जयपूर, राजस्थान येथे आहे. या बाजारात तुम्हाला एकापेक्षा एक कृत्रिम दागिने मिळतील. तथापि, काही पारंपारिक दशके जुनी दुकाने देखील येथे आहेत, जिथून तुम्ही खरे सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करू शकता. विशेषत: जर तुम्हाला जोधपुरी आणि राजस्थानी दागिन्यांची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी स्वर्ग आहे.