जंगलात राहणारे भक्षक प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात. त्यांच्यासाठी हे प्राणी त्यांचे अन्न असते, शिकार करताना हे प्राणी सहसा दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याची शिकार करतात. पण, त्याचबरोबर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, असे काही प्राणी आहेत, जे त्यांच्याच प्रजातीच्या प्राण्याला खातात. नरभक्षण (Cannibalism) म्हणजे एकाच प्रजातीच्या दुसऱ्या प्राण्याला खाण्याची कृती नैतिकदृष्ट्या अस्वीकार्य मानली जाते. तसेच, ही बाब आरोग्य आणि उत्क्रांतीला धोक्यात आणू शकते. त्यामुळे रोग पसरू शकतात आणि आनुवंशिक विविधता धोक्यात येऊ शकते. जरी ही बाब धक्कादायक वाटत असली तरी प्राणी जगतात ही गोष्ट तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त सामान्य आहे. काही प्राणी आश्चर्यकारक कारणांमुळे स्वतःच्या प्रजातीचे प्राणी खातात, ज्यामुळे त्यांना जगण्यास मदत होते. उदाहरणार्थ- काही प्राणी स्वतःची पिल्लेदेखील खातात!
स्वत:चीच पिल्ले खाणारे ५ प्राणी :
१. सिंह (Lions)
जेव्हा एखादा नवीन नर सिंह एखाद्या सिंहाच्या कळपाचा ताबा घेतो, ज्यात सिंहिणी आणि शावक आहेत. पण, तो सिंह कळपाचा ताबा घेतल्यानंतर सामान्यतः अस्तित्वात असलेल्या कोणत्याही शावकांना मारतो; जेणेकरून त्याला ‘सावत्र पिता’ व्हावे लागू नये आणि दुसऱ्या सिंहांच्या पिल्लांना सांभाळण्यात त्याची संसाधने गुंतू नयेत. याचाच अर्थ असा की, तो मादी सिंहिणीबरोबर लवकर प्रजनन प्रक्रियेसाठी संबंध ठेवू शकतो. बालहत्या सामान्य असली तरी नरभक्षण कधी कधीच होते; परंतु नेहमीच तसे नसते.

२. चिंपांझी (Chimpanzees)
जरी चिंपांझी प्रामुख्याने शाकाहारी असले तरी त्यांना अन्नासाठी माकडे आणि डुकरांची शिकार करणे आवडते. पण, काही नर चिंपांझी नवजात अर्भकांना खाताना आढळले आहेत. विशेषतः जेव्हा त्यांना शंका येते की, ते त्या पिल्लाचे वडील नाहीत. “या वर्तनामुळे त्यांच्या आईशी मिलन होण्याची आणि प्रतिस्पर्धी नरांना मागे टाकण्याची शक्यता वाढते”, असे मानले जाते.

३. हॅम्स्टर(Hamsters)
बंदिवासात आणि जंगलात हॅम्स्टर माता स्वतःच्या नवजात बालकांना खाते. हे सहज घडते जेव्हा आईला आवश्यक घटकांची कमतरता असते किंवा तिला ताण येतो, याकडे आक्रमकतेपेक्षा जगण्यासाठी करण्यात आलेली प्रतिक्रिया म्हणून पाहिले जाते.

४. केन टॉड्स(Cane Toads)
नरभक्षकपणा हा केवळ पालक-संततींच्या नात्यापुरता मर्यादित नाही, तर तो भावंडांमध्येही दिसून येतो. केन टॉड्सच्या बाबतीत, मोठे टॅडपोल वारंवार नवीन जन्मलेल्या भावंडांना खातात. हे वर्तन संसाधनांसाठी स्पर्धा कमी करण्यास मदत करते आणि बलवान व्यक्तींसाठी जगण्याचा दर सुधारते.

५. ससा (Rabbits)
भक्षकांना त्यांची घरटी सापडू नयेत म्हणून ससे त्यांच्या मृत बाळांना गिळून टाकतात, असे मानले जाते. मृत बाळांचा कोणताही पुरावा नष्ट करतात; जेणेकरून ते त्यांच्या जिवंत पिल्लांचे संरक्षण करू शकतील.
