Oldest animals on Earth : पृथ्वीवरील जीवन ३.५ अब्ज वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे, पृथ्वीवरील काही प्राणी शेकडो-लाखो वर्षांपासून जवळजवळ अपरिवर्तीत राहिले आहेत, ज्यामुळे ते प्रागैतिहासिक काळाची झलक दाखवणारे जिवंत जीवाश्म ( living fossils ) ठरले आहेत.

प्रागैतिहासिक काळ म्हणजे मानवाच्या सांस्कृतिक इतिहासातील प्रथम कालखंड होय. हा ‘दगडी साधनांचा वापर’ आणि ‘लेखन पद्धतीच्या आविष्काराने नोंद केलेल्या इतिहासाची सुरुवात’, या दोन्ही कालखंडाच्या दरम्यानचा काळ आहे, तर जिवंत जीवाश्म हे लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात आले होते.

या प्राचीन प्रजातींनी मोठ्या प्रमाणात नामशेष होणे (extinctions), हवामान बदल (climate shifts) आणि उत्क्रांती बदलांना (evolutionary changes) तोंड दिले आहे आणि त्यांची लवचिकता (resilience) सिद्ध केली आहे. आज आपण शतकानुशतके जुन्या प्राण्याबद्दल जाणून घेऊ या

समुद्राच्या खोलीपासून ते जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत, पृथ्वीवरील आठ सर्वात जुन्या प्राण्यांची यादी खाली दिली आहे. यापैकी एक प्राणी असा आहे, जो पृथ्वीवर शक्तिशाली डायनासोर येण्याआधीपासून अस्तित्वात आहे!

१. हॉर्सशू क्रॅब (Horseshoe Crab) – ४५० दशलक्ष वर्षे जुना
वैज्ञानिक नाव: लिमुलिडे (Limulidae)

डायनासोरच्या आधीपासून हॉर्सशू क्रॅब अस्तित्वात आहेत. त्यांच्या कठीण बाह्य सांगाड्यामुळे आणि तांबे या धातूचे प्रमाण जास्त असलेल्या निळ्या रक्तामुळे ते जवळजवळ ४५० दशलक्ष वर्षांपासून जसे आहेत तसेच राहिले आहेत. वैद्यकीय संशोधनात त्यांचे रक्त अत्यंत मौल्यवान आहे, कारण ते लस आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये बॅक्टेरियाचे दूषित घटक शोधते.

२. नॉटिलस (Nautilus) – ५०० दशलक्ष वर्षे जुना
वैज्ञानिक नाव: नॉटिलिडे( Nautilidae)

नॉटिलस खोल समुद्रातील सेफॅलोपॉड (cephalopod), प्राचीन अमोनाइट्सशी (ancient ammonites) साम्य असल्यामुळे त्याला “जिवंत जीवाश्म” म्हटले जाते. ५०० दशलक्ष वर्षांहून अधिक काळ आहे तसाच राहिलेल्या नॉटिलसमध्ये एक कालातीत रचना आहे, ज्यामध्ये एक प्रतिष्ठित स्पायरल शेल (spiral shell) आणि जेट प्रोपल्शन पोहण्याची (jet propulsion swimming) क्षमता आहे, जी शतकानुशतके टिकून आहे.”

स्पायरल शेल एक अद्वितीय कवच आहे, जे त्याच्या मऊ शरीराचे रक्षण करते आणि जेट प्रोपल्शन हा पोहण्याचा एक विशेष मार्ग ज्यामध्ये तो त्याच्या कवचातून पाणी बाहेर काढतो आणि एक जलद गतीने प्रवाह तयार करतो आणि स्वतःला पुढे ढकलतो.

३. कोएलाकँथ (Coelacanth) – ४०० दशलक्ष वर्षे जुने
वैज्ञानिक नाव: लॅटिमेरिया (Latimeria)

एकेकाळी ६५ दशलक्ष वर्षे नामशेष झाल्याचे मानले जाणारे कोएलाकँथ १९३८ मध्ये पुन्हा आढळले, जे पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचिकत झाले होते. खोल समुद्रातील या माशांना लोबेड फिन्स (lobed fins) असतात, जे प्राचीन काळातील स्थलीय पृष्ठवंशी प्राण्यांच्या अवयवांसारखे (Limbs of early terrestrial vertebrates) दिसतात, ज्यामुळे उत्क्रांती समजून घेण्यासाठी ते महत्त्वाचे ठरतात.

४. जेलीफिश – ५००-७०० दशलक्ष वर्षे जुने
वैज्ञानिक नाव: मेडुसोझोआ (Medusozoa)

जेलीफिश हे सर्वात जुन्या ज्ञात बहुपेशीय जीवांपैकी एक आहे, जे किमान ५००-७०० दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहे. त्यांच्याकडे हाडे, मेंदू आणि हृदय नाही, तरीही त्यांच्या साध्या पण कार्यक्षम जैविक रचनेमुळे पृथ्वीवरील प्रजाती मोठ्या प्रमाणात नामशेष होण्याच्या पाच महत्त्वाच्या घटनांमधूनही तो सुरक्षित राहिला आहे.

५. ट्रायप्स (Tadpole Shrimp) – ३०० दशलक्ष वर्षे जुने
वैज्ञानिक नाव: ट्रायप्स कॅन्क्राइफॉर्मिस (Triops cancriformis)

ट्रायप्स, ज्यांना Tadpole Shrimp म्हणूनही ओळखले जाते, कार्बोनिफेरस (Carboniferous) काळापासून अस्तिवात आहेत आणि दुष्काळ-प्रतिरोधक अंडी घालून त्यांनी जगण्याची क्षमता परिपूर्ण केली आहे. ही अंडी दशके निष्क्रिय राहू शकतात, ज्यामुळे त्यांना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत वाढण्यास मदत होते आणि ते अंडी उबवण्यासाठी अनुकूल वातावरणाची वाट पाहातात.

कार्बोनिफेरस काळ हा एक भूगर्भीय काळ होता, जेव्हा पृथ्वी दलदलीच्या जंगलांनी व्यापलेली होती आणि कोळसा तयार झाला होता.

६. स्टर्जन (Sturgeon) – २०० दशलक्ष वर्षे जुने
वैज्ञानिक नाव: अ‍ॅसिपेन्सेरिडे (Acipenseridae)

स्टर्जन २० कोटी वर्षांपासून डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहेत. हे मोठे गोड्या पाण्यातील मासे कॅविअर (caviar – स्टर्जन माशाच्या अंडी ) तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे ते सर्वात व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान प्राचीन प्रजातींपैकी एक आहेत.

७. तुआतारा (Tuatara)- २५० दशलक्ष वर्षे जुने
वैज्ञानिक नाव: स्फेनोडॉन ( Sphenodon)

न्यूझीलंडचे मूळ रहिवासी असलेले तुआतारा सरड्यांसारखे दिसतात, परंतु ते रायंचोसेफॅलिया (Rhynchocephalia) नावाच्या वेगळ्या प्राचीन वर्गाचे आहेत. त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला तिसरा “पॅरिएटल डोळा” (parietal eye – “डोक्याच्या वर एक तिसरा डोळा) असतो, जो आधुनिक सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळणारी दुर्मीळ गोष्ट आहे.

८. स्पंज(Sponge) – ६०० दशलक्ष वर्षांहून अधिक जुने

वैज्ञानिक नाव: पोरिफेरा (Porifera )

स्पंज हे पृथ्वीवरील सर्वात जुन्या प्राण्यांपैकी एक आहेत, ज्यांचे जीवाश्म रेकॉर्ड ६०० दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. त्यांच्या शरीराच्या रचना साध्या असूनही ते पाणी शुद्ध करून आणि इतर जीवांसाठी निवासस्थान प्रदान करून सागरी परिसंस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

.

Story img Loader