Pune Manapa Bridge History: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात मराठी माणसालाच नाही तर देशातील प्रत्येकाला कुतूहल आहे. आपल्या शौर्यानं आणि चातुर्यांनं मुघलांच्या सैन्याला हरवत आपल्या पदरी त्यांनी न भूतो न भविष्यती असे यश प्राप्त केले. आजही महाराजांची रणनिती, स्वराज्याबद्दलची ओढ, महिलांचा सन्मान, सकारात्मक यासारख्या असंख्य गोष्टी शिकण्यासारखं आहे. महाराजांचा संपूर्ण जीवनपटच आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आज कित्येक वर्षं झाली तरी भक्कमपणे उभे आहेत. त्याप्रमाणेच पुण्यातील इतिहासकालीन अस्तित्व जपून ठेवणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल‘ आहे असे म्हणता येईल. या पुलाला अनेक जण मनपाचा पूल, नवा पूल किंवा इतर कुठल्या नावांनीही ओळखत असतील. आज याच पुलाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत.

पुणे हे इतिहासातल्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. त्यामुळे इथली बरीचं ठिकाणं, इमारती या इतिहासकालीन आहेत. असाच इतिहासकालीन अस्तित्व जपून ठेवणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल‘. या पुलाला अनेक जण मनपाचा पूल, नवा पूल किंवा इतर कुठल्या नावानं ओळखत असतील. सध्याच्या टाय घातलेल्या अभियंत्यांनाही विचार करायला लावणारा असा हा आखीव-रेखीव पूल १०० वर्षांपूर्वी मराठी माणसाने बांधला होता. अशा त्या कर्तबगार मराठमोळ्या माणसाचं नाव आहे गणपतराव महादेव केंजळे

monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede: तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? कारण आलं समोर!
cr start work of widening the pedestrian bridge at Diva railway station
दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
Construction of 210-meter-long bridge on Bullet Train route on National Highway 48 in Gujarat completed
बुलेट ट्रेन मार्गावरील २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?

‘छत्रपती शिवाजी महाराज पूल’ इतिहास

विसाव्या शतकापर्यंत मुठा नदीच्या उजव्या तीरावर पुणे शहर विसावलं होतं. नंतरच्या काळात हळूहळू इथे गर्दी वाढू लागली. नदीकाठावरच वस्ती असल्यानं गर्दीमुळे साथरोगाची समस्याही वाढू लागली. त्यामुळे नदीच्या डाव्या बाजूला वस्तीचा विस्तार करणं गरजेचं होतं. पुढे शहराचा विस्तार वाढला आणि या बाजूलाही विस्तार वाढू लागला. मात्र, सुरुवातीपासून जीवनावश्यक वस्तू, संसाधने ही उजव्या बाजूला होती. त्यामुळे प्रत्येक वेळी नदी ओलांडावी लागायची. म्हणून यावर उपाय म्हणून नवीन पूल बांधण्याची कल्पना पुढे आली. १९२० च्या जानेवारी महिन्यामध्ये या पुलाचं काम सुरू झालं आणि १९२३ मध्ये हा पूल बांधून तयार झाला. १७ सप्टेंबर १९२३ साली मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाबद्दल एक खास गोष्ट सांगितली जाते आणि ती म्हणजे या पुलाला जरी तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज यांचं नाव असलं तरी या पुलाच्या रचनेमध्ये मराठमोळ्या माणसाचा मोठा वाटा आहे. हा मराठमोळा माणूस म्हणजे गणपतराव महादेव केंजळे.

गणपतराव महादेव केंजळे हे तत्कालीन प्रमुख ठेकेदार होते. त्यांनीच शनिवार वाड्यासमोरील बटाट्या मारुतीचं मंदिर बांधलं.

हेही वाचा >> ITR लवकर दाखल करा, नाहीतर भरावा लागेल पाच हजारांचा दंड; कसे भरावे आयटी रिटर्न? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

अशी अतिशय रंजक व क्वचितच कुणाला माहीत नसलेली माहिती लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेद्वारे आपल्याला मिळते.

Story img Loader