First Sunrise In India: भारतातील पहिला सूर्योदय कुठे होतो हे तुम्हाला माहीत आहे का? सर्वसाधारणपणे सूर्यास्त हा सायंकाळी सहाच्या दरम्यान होतो. मात्र, भारतात एक गाव असे आहे जिथे दुपारी चार वाजताच सुर्यास्त होतो. तर, या गावात पहाटे ३ वाजताच सूर्य उगवतो. अरुणाचल प्रदेश हे भारतात सर्वात प्रथम सूर्योदय होणारे राज्य आहे. भारतात सूर्याची पहिली किरण ज्या गावावर पडतात ते पहिले गाव देखील अरुणाचल प्रदेशमध्येच आहे. कदाचित बहुतेक लोकांना माहित असेल की अरुणाचल प्रदेश हा भारतातील पहिला दिवस आहे. पण, इथे आम्ही अरुणाचल प्रदेशातील त्या ठिकाणाविषयी सांगणार आहोत, जिथे सूर्याची किरणे देशाच्या इतर भागांत पोहोचण्यापूर्वीच सर्वात आधी पोहोचतात.

या गावाचे नाव डोंग असे आहे. हे गाव अतिशय छोटं आणि फारच सुंदर आहे. भारत- चीन- म्यानमार ट्राय जंक्शनवर डोंग हे पिटुकले गाव वसलेले आहे. पृवोत्तर सीमेवरचे भारत हद्दीतले हे पहिले गाव आहे. अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यातील डोंग ही छोटी वस्ती, पहाटेचे स्वागत करणारे भारतातील पहिले स्थान आहे. १,२४० मीटर उंचीवर वसलेले, डोंग लोहित नदी आणि तिची उपनदी, सती यांच्या संगमावर पाळलेले आहे. १९९९ मध्ये सापडलेला हा भौगोलिक चमत्कार, भव्य हिमालयाने व्यापलेला आहे आणि चीन आणि म्यानमारच्या आंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेला आहे.

Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Do butterflies sleep at night
माणसांप्रमाणे फुलपाखरंही रात्री झोपतात का? जाणून घ्या रंजक माहिती…
Indian Railway Highest Revenue Generating Train
Indian Railways : ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई १,७६,०६,६६,३३९; वंदे भारत, शताब्दी एक्सप्रेसलाही टाकले मागे
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा

डोंग गाव त्याच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. या प्रदेशात राहणाऱ्या स्थानिक मिश्मी जमातींना निसर्गाच्या लयीत गुंफलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. पहिल्या सूर्योदयाच्या दर्शनासाठी डोंग हे गाव ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. डोंगच्या प्रवासात ८ किलोमीटरचा ट्रेक समाविष्ट आहे जो चित्तथरारक दृश्ये आणि हिमालयाच्या शिखरांच्या मागे सूर्योदयाचा अविस्मरणीय अनुभव देतो.

या गावाची लोकसंख्या फक्त ३५

या गावाचा लोकसख्यंच्या बाबतीत देखील अनोखा विक्रम आहे. अतिशय निसर्गसुंदर अशा या गावात जवळपास फक्त ३५ लोक राहतात. शेती हाच येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय आहे. या गावात पर्यटकांना राहण्यासाठी अजून पुरेश्या सुविधा देखील नाहीत. पाटबंधारे विभागामार्फत शेजारच्या वालोंग गावात पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा दिली आहे. वालोंग येथेच १९६२ चे भारत चीन युद्ध झाले होते. या ठिकाणी सैन्याचा मोठा तळ देखील आहे. डोंग येथील सूर्योदय पाहण्यासाठी येथून ८ किमीचा ट्रेक करून जावे लागते.

हेही वाचा >> First New Year: सर्वात आधी कोणत्या देशात नवीन वर्ष साजरे होते? ‘या’ देशात शेवटी साजरा होतो New Year, जाणून घ्या

तु्म्हालाही डोंग या गावाला भेट देण्याची इच्छा असेलतर आदर्श कालावधी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो जेव्हा हवामान ट्रेकिंगसाठी सर्वात अनुकूल असते आणि जेव्हा सूर्योदय विशेषतः नेत्रदीपक असतो. या महिन्यांत, आकाश निरभ्र असते आणि हवा असते, ज्यामुळे सूर्योदयाचा साक्षीदार होण्यासाठी पहाटेची चढाई एक जादुई अनुभव देते.

Story img Loader