मध एक अशी गोष्ट आहे, ज्याचा वापर गेल्या कित्येक वर्षांपासून आपले पूर्वज करत आहेत. मधाला पवित्र मानले जाते. पूजा करताना देखील मध वापरला जातो. तसे मध तुम्हाला तुमच्या परिसरातील कोणत्याही दुकानामध्ये मिळले ज्याची किंमत काही रुपये असेल पण आज आम्ही तुम्हाला अशा मधाबाबत माहिती देणार आहोत जो जगातील सर्वात महाग मध मानले जाते. त्यामुळे याची इतकी जास्त आहे की तेवढ्या किंमतीत एक कार खेरदी केली जाऊ शकते.
जगातील सर्वात महाग मध कोणते आहे?
हा मध तुर्कीच्या सेंटॉरी(Centauri) कंपनीचा आहे. ही कंपनी जगातील सर्वात महागडा मध विकते, हे केवळ आम्ही नव्हे तर तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने हे सांगितले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, या कंपनीचा मध संपूर्ण जगात सर्वात महाग विकला जातो, त्यातील एक किलोची किंमत १० हजार युरो आहे. म्हणजेच, जर त्याचे भारतीय रुपयांमध्ये रूपांतर केले तर ते ९ लाख रुपयांपेक्षा जास्त होईल.
या मधात काय विशेष आहे
या मधाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा मधासारखा गोड नसून थोडा कडू आहे. पण, हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. या मधामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात असे म्हटले जाते. हा मध आणखी महाग विकला जातो कारण सामान्य मधाप्रमाणे वर्षातून दोन-तीन वेळा काढला जात नाही तर एकदाच काढला जातो.
हा मध एका खास पद्धतीने तयार केला जातो
हा मध करण्याची प्रक्रिया खूप खास आहे. ते उत्कृष्ट दर्जाचे बनवण्यासाठी, कंपनी निवासी भागापासून दूर जंगलातील गुहेत तयार करते. या गुहेभोवती औषधी वनस्पती उगवल्या आहेत, ज्यामुळे मधमाश्या या फुलांचा रस शोषून औषधी मध तयार करू शकतात. हा मध बाजारात विकण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तुर्की फूड इन्स्टिट्यूटद्वारे तपासली जाते, त्यानंतरच तो ग्राहकांना विकला जातो.