How to update bank details in NPS online : नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System- NPS) ही एक सरकारची निवृत्ती बचत योजना आहे, जी सुरक्षित आणि ठरावीक पद्धतीने गुंतवणुकीचा पर्याय पुरवते. ही सरकारी योजना २००४ मध्ये सुरू झाली, जी PFRDA कायदा, २०१३ अंतर्गत पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (Pension Fund Regulatory and Development Authority -PFRDA)द्वारे नियंत्रित केली जाते.

१८ ते ६० वयोगटातील सर्व भारतीय या योजनेत सहभागी होऊ शकतात. एनपीएस योजना ही कर्मचारी आणि रोजगार देणाऱ्या दोघांनाही या निवृत्ती निधीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देते. या योजनेद्वारे तुम्ही दोन प्रकारची खाती उघडू शकता. टियर १ आणि टियर २. नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये (NPS) टियर १ हे निवृत्तीसाठी बचत करण्याचे मुख्य खाते आहे आणि टियर २ हे एक ऐच्छिक खाते आहे, जे गुंतवणुकीसाठी अधिक पर्याय आणि लवकर पैसे काढण्याची सोय उपलब्ध करून देते. खातेधारक या दोन्ही खात्यांमधील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80CCD(1)अंतर्गत १.५ लाखापर्यंत कर लाभ मिळवू शकतात.

एनपीएसची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीप्रमाणे :

एनपीएस ही सर्वात कमी किमतीची पेन्शन योजना आहे.

एनपीएसअंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टीम ( NPS ) मध्ये कर्मचारी आणि नियोक्त्याच्या योगदानावर १.५ लाख कर सवलत मिळू शकते.

एनपीएस ही एका उत्तम गुंतवणूक योजनेसाठी एका स्थिर रिटर्नची हमी देते. तसेच एनपीएस फंड मॅनेजरद्वारे एनपीएस रिटर्न जारी केले जातात.

एनपीएसमध्ये व्यावसायिक निधी व्यवस्थापन (Professional Fund Management) PFRDA द्वारे नियमितपणे पाहिले जाते आणि व्यावसायिक पेन्शन फंड (Professional Pension Funds) या निधीचे व्यवस्थापन करतात. त्याद्वारे तुमची बचत सरकारी बाँड, बिले, तसेच शेअर्समध्ये गुंतवली जाते.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) ची सुरक्षा वाढविण्यासाठी पीएफआरडीएद्वारे कठोर नियम पाळले जातात.

एनपीएसमध्ये बँक माहिती ऑनलाइन कशी अपडेट करावी?

जर तुम्हाला एनपीएसमध्ये तुमच्या बँक खात्याची माहिती बदलायची असेल, तर या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

http://www.cra-nsdl.com वर तुमच्या एनपीएस अकाउंट लॉग इन करा.

त्यानंतर तुमचे अकाउंट अॅक्सेस करण्यासाठी तुमचा PRAN नंबर आणि पासवर्ड टाका.

‘डेमोग्राफिक चेंजेस’ या पर्यायावर क्लिक करा आणि ‘अपडेट पर्सनल डिटेल्स’ हा पर्याय निवडा.

तुमचे बँक अकाउंट आणि अकाउंट प्रकार अपडेट करण्यासाठी पर्याय निवडा.

तुमच्या नवीन बँकची माहिती (अकाउंट नंबर, आयएफएससी व अकाउंट प्रकार) टाका

ओटीपी किंवा आधार ई-साइनद्वारे तुमचे अकाउंट अधिकृत करा.

त्यानंतर नवीन बँक माहिती तुमच्या एनपीएस खात्यात अपडेट केली जाईल.

तुमचे बँक माहिती अपडेट करून, तुम्ही पैसे काढण्यासाठी आणि पेन्शन पेमेंटसाठी सुरक्षित आर्थिक व्यवहार करू शकता.