अनेक लोकांना २४ तास कमी पडतात, तर अनेकांचा वेळ झोपेमध्ये जातो. काही जण १०-१२ तास कार्यालयामध्येच काम करतात, तर बऱ्याच लोकांचा वेळ खाण्यामध्ये व्यतीत होतो. प्रत्येकजण २४ तासांमध्ये वेगवेगळ्या कृती करत असतात. संशोधकांनी शहरातील लोकांच्या दैनंदिन क्रियाकलापांवर संशोधन करून लोक आपला वेळ कसा व्यतीत करतात, हे सांगितले आहे. झोप, काम करणे, खाणे आणि अन्य कृती यापैकी कोणत्या गोष्टीला लोक प्राधान्य देतात, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘इथे’ आहे पृथ्वीवरील सर्वात शुद्ध हवा; जाणून घ्या ‘या’ बेटाविषयी…

‘आम्हाला २४ तासही पुरत नाहीत’ असे अनेक लोक म्हणताना दिसतात. काहीजणांना पूर्ण दिवसात काय केले हे आठवण्याची सवय असते. परंतु, बहुतांशी लोक काम संपवतात आणि झोपतात. आपला दिवसभराचा वेळ कसा, कधी, कुठे जातो याचा विचार करत नाहीत. यशस्वी होणाऱ्या व्यक्तींकडे, उद्योजकांकडे, सामान्य माणसाकडे आणि अयशस्वी व्यक्तीकडेही २४ तासच उपलब्ध असतात. पण, काही लोक यशस्वी होतात, काही अयशस्वी. असे का होते ? ‘द ग्लोबल ह्यूमन डे’ यांनी या संदर्भात संशोधन केले. संशोधकांनी सांगितले की, तुम्ही २४ तासांचे नियोजन कसे करता याच्यावर तुमची यशस्विता अवलंबून आहे.

पृथ्वीवर सर्वांना २४ तास मिळतात. यामध्ये खाणे, झोपणे, फिरणे, वैयक्तिक गोष्टी, कार्यालयीन काम, सामाजिक काम, प्रवास आणि अन्य घटकांचा समावेश होतो.

हेही वाचा : काकड आरती का करतात माहीत आहे का ? जाणून घ्या गावोगावची सुंदर परंपरा

लोक कसे घालवतात २४ तास ?

संशोधकांच्या मते, लोक साधारणतः १४ तास ५४ मिनिटे विविध क्रियाकलापांमध्ये, तर ९ तास ६ मिनिटे झोपेमध्ये घालवतात. ‘वर्किंग अवर्स’मध्ये ९ तास २४ मिनिटे हे सृजनात्मक कामांमध्ये व्यतीत होतात. यामध्ये कार्यालयीन काम, नवीन काही शिकणे, संशोधन, पुनर्निर्मिती किंवा ज्यातून काही ‘आऊटकम’ मिळेल, अशा कृती करतात. २ तास ६ मिनिटे हे व्यवस्थापनात्मक कामांमध्ये जातात. यामध्ये किराणा सामान आणणे, सरकारी किंवा अन्य बँकेतील कामे, व्यवस्थापनात्मक काम करणे, प्रवास करणे, अशा कामांचा यामध्ये समावेश होतो. तीन.चार तास हे बाह्य कामे करण्यात जातात. यामध्ये साफसफाई, बाग-बगीचाचे काम, पाळीव प्राण्यांची काळजी, घरातील कामे यांचा यामध्ये समावेश होतो. अधिक शारीरिक हालचाली या तासांमध्ये केल्या जातात.

सूक्ष्मस्तरावर कामांचे नियोजन लोक कसे करतात ?

४ तास ६ मिनिटे लोकांशी बोलण्यात, चर्चा करण्यात, वैचारिक-अनौपचारिक देवाणघेवाण करण्यात जातात. १ तास ३६ मिनिटे खाण्यापिण्यामध्ये, १ तास ६ मिनिटे वैयक्तिक स्वच्छता, काळजी घेण्यामध्ये जातात. तेवढाच वेळ नवीन काही शिकण्यामध्ये, जाणून घेण्यामध्ये जातात.
५४ मिनिटे हे प्रवासामध्ये, तेवढाच वेळ स्वयंपाक करण्यामध्ये व्यतीत होतो. ४८ मिनिटे अन्न तयार करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यामध्ये जातात. तेवढाच वेळ साधारण देखभालीमध्ये जातो. २४ मिनिटे काही शारीरिक क्रियाकलापांमध्ये जातात. १८ मिनिटे मुलांचे संगोपन किंवा तत्सम कृतींमध्ये जातात. १२ मिनिटे हे आरोग्याची काळजी घेण्यात, साधारण तेवढाच वेळ धार्मिक कृतींमध्ये जातो.

‘ग्लोबल ह्युमन डे’ने शहरातील सुमारे ८ मिलियन लोकांच्या क्रियाकलापांचे निरीक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे.