न्यायदेवतेची मूर्ती म्हटले, तर आपल्या डोळ्यांसमोर येते ती डोळ्यांवर पट्टी बांधलेली, एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात तराजू असलेली एक मूर्ती. काल्पनिक कथांपासून ते अगदी बॉलीवूडच्या चित्रपटांपर्यंत न्यायदेवतेची हीच मूर्ती पाहायला मिळते. मात्र, या मूर्तीचे स्वरूप आता बदलण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेची मूर्ती बदलण्यात आली आहे. या बदलांमधील सर्वांत प्रमुख व ऐतिहासिक बदल म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे आणि मूर्तीच्या एका हातात तराजू, तर दुसर्‍या हातात आता तलवारीऐवजी भारतीय संविधान असल्याचे दिसून येत आहे. या ऐतिहासिक बदलामागील कारण काय? न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी का बांधण्यात आली होती? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी का होती?

न्यायदेवतेची मूर्ती प्रामुख्याने इजिप्त, ग्रीक व रोमन साम्राज्यामध्ये दिसून येते. या साम्राज्यातूनच न्यायदेवतेच्या मूर्तीचा जगभरात स्वीकार करण्यात आला. या मूर्तीला न्यायाचे प्रतीक मानले जाते. डोळ्यांवर पट्टी, एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार, अशी न्यायदेवतेची मूर्ती चित्रित केली जाते. न्यायदेवतेच्या हातामध्ये तराजू व तलवार आणि तिच्या डोळ्यांवर असणारी पट्टी हे न्यायव्यवस्थेच्या नैतिकतेचे प्रतीक मानले जाते. डोळ्यांवर असणारी पट्टी निःपक्षपातीपणा दर्शवते. यातून हे सूचित होते की, न्याय हा पक्षपात न करता, संपत्ती, शक्ती किंवा सामाजिक स्थिती याकडे दुर्लक्ष करून, सर्वांच्या बाबतीत समान आहे. “कायदा आंधळा आहे,” हा आदर्श या डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या स्त्रीमध्ये मूर्त आहे; जो प्रत्येक युक्तिवाद पूर्णपणे तथ्य आणि कायद्यावर आधारित आहे, असे दाखवून देतो.

Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!
robbery jewelery Lonavala, robbery Lonavala,
लोणावळ्यात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ, महिलांमध्ये घबराट
Women jewelery theft Alandi, Women jewelery Alandi,
पुणे : दुचाकीवरील महिलेकडील चार लाखांचे दागिने चोरले, आळंदी रस्त्यावरील घटना
gold jewellery stolen from female passenger bag at swargate st bus depot
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवासी महिलेचे दागिने चोरीला
Loksatta chaturanga Streeshakti Prabodhan Volunteer women group Social awareness
सामाजिक जाणिवेची पंचविशी
allu arjun shah rukh khan
अल्लू अर्जुनच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात का घेतले शाहरुख खानचे नाव? जाणून घ्या
न्यायदेवतेची मूर्ती प्रामुख्याने इजिप्त, ग्रीक व रोमन साम्राज्यामध्ये दिसून येते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केवळ आठ वर्षे सत्तेवर का राहू शकतात? काय आहेत नियम?

असे सांगितले जाते की, देव जसा प्रत्येकाकडे भेदभाव न करता समान नजरेने पाहतो, त्याप्रमाणे न्यायदेवताही सर्वांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहते. त्याच उद्देशाने न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आहे. त्याचा अर्थ असा की, कोणत्याही व्यक्तीकडे न पाहता न्याय देणे. १७ व्या शतकात न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते; मात्र, त्यानुसार न्यायदेवतेचे आंधळेपण दाखविण्यासाठी ही पट्टी बांधण्यात आल्याचे मानले जाते.

न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे; जे संतुलन आणि निष्पक्षतेचे प्रतीक आहे. हा तराजू इजिप्तमधील संस्कृतीमधून आल्याचे सांगितले जाते, जो इजिप्तमध्ये न्यायाचे प्रतीक मानला जातो. युक्तिवादाच्या दोन्ही बाजूंकडे समान लक्ष देऊन न्यायदान केले जावे, असा या तराजूचा अर्थ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन मूर्तीमध्येदेखील तराजू कायम ठेवण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या हातातील तलवार हे शक्तीचे प्रतीक आहे; जी तलवार नवीन मूर्तीच्या हातामधून हटवण्यात आली आहे. न्याय दिल्यानंतर त्या न्यायाची अंमलबजावणी व्हावी हे दर्शविण्यासाठी न्यायदेवतेच्या हाती तलवार असते. आता नवीन मूर्तीमध्ये तलवारीची जागा भारतीय संविधानाला देण्यात आली आहे.

मूर्तीमध्ये बदल का करण्यात आले?

भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयातील ग्रंथालयात नवी मूर्ती ठेवण्यात आली आहे. भारताने अलीकडेच ब्रिटिशकालीन इंडियन पीनल कोड कायद्यांमध्ये बदल केला आहे आणि भारतीय न्याय संहिता कायदा लागू केला आहे. न्यायदेवतेच्या मूर्तीमधील बदलही त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. न्यायाची देवता ही एक प्राचीन ग्रीक देवता आहे. ग्रीक संस्कृतीत थेमिस ही न्यायाची देवता आहे; जिच्या एका हातात तराजू, तर दुसऱ्या हातात तलवार आहे.

न्यायाची देवता ही एक प्राचीन ग्रीक देवता आहे. ग्रीक संस्कृतीत थेमिस ही न्यायाची देवता आहे; जिच्या एका हातात तराजू, तर दुसऱ्या हातात तलवार आहे. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

न्यायदेवतेच्या मूर्तीचा इतिहास

न्यायदेवतेची मूर्ती प्राचीन ग्रीक आणि रोमन आयकॉनोग्राफीमधून उद्भवली आहे. ही मूर्ती म्हणजे समाजाला चालना देणारा कायदा आणि नैतिक शक्ती यांचे प्रतीकात्मक रूप आहे, असे मानले जाते. तसेच, न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तराजूचे प्रतीकत्व प्राचीन ग्रीस संस्कृतीशी जुळले असल्याचेही सांगितले जाते. असे मानले जाते की, आधुनिक काळातील न्यायदेवतेचे मूळ रोमन पौराणिक कथांमधील न्यायाची देवी जस्टिटिया हिच्याशी आहे; जिला इस्टिटिया म्हणूनही ओळखले जात असे. मध्ययुगीन काळात न्यायदेवतेचा संबंध अधिकाधिक ख्रिश्चन मूल्यांशी संबंधित होता. परंतु, त्याच्या काही काळानंतर ही मूर्ती कला आणि वास्तुकला यांच्यामध्ये अधिक प्रचलित झाली. याच काळात डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या स्त्रीची मूर्ती न्यायालयामध्ये आणि कायदेशीर ग्रंथांमध्ये दिसू लागली.

हेही वाचा : हुकूमशहा किम जोंग उन सक्रिय; उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया युद्धाच्या उंबरठ्यावर?

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नवीन मूर्तीच्या निर्णयाकडे भारताचा वसाहतवादी वारसा मागे टाकण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. कारण- देश भारतीय न्याय संहितेबरोबर एका नव्या युगात पाऊल टाकत आहे. भारतातील ब्रिटिश राजवटीतच ही मूर्ती देशातील न्यायाची प्रतीक झाले. जेव्हा इंग्रजांनी भारतावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले तेव्हा त्यांनी स्वतःची कायदेशीर व्यवस्था सुरू केली. ब्रिटिशांनी लागू केलेल्या भारतीय दंड संहितेची जागा नुकतीच भारतीय न्याय संहितेने घेतली आहे. भारतीय न्यायालयांबाहेर न्यायदेवतेच्या मूर्तीची उपस्थिती या वसाहतवादी वारशाची आठवण करून देते.

Story img Loader