First Underground train: भारतीय रेल्वे आज जगातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. ज्यात ट्रेन, अंडरग्राउंड आणि अगदी अंडरवॉटर ट्रेन्सचीदेखील सेवा पुरवली जात आहे. परंतु, जर आपण फक्त मेट्रोबद्दल जाणून घ्यायचे ठरवले तर भारताचे मेट्रो नेटवर्क चीन आणि अमेरिकेनंतर जगात तिसरे येते. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? जगातील पहिली अंडरग्राउंड ट्रेन कधी आणि कुठे सुरू झाली?

या दिवशी धावली जगातील पहिली अंडरग्राउंड ट्रेन

जगातील पहिली अंडरग्राउंड ट्रेन १६२ वर्षांपूर्वी लंडनमध्ये धावली होती. या दिवशी म्हणजे १० जानेवारी १८६३ रोजी लंडनमध्ये जगातील पहिली अंडरग्राउंड ट्रेन धावली. विशेष म्हणजे यासाठी ११ वेगवेगळ्या लाईन टाकण्यात आल्या होत्या. या रेल्वे मार्गांना व्हिक्टोरिया, सेंट्रल, मेट्रोपॉलिटन, ज्युबिली आणि बेकरलू अशी नावे देण्यात आली. या लाईन त्यांच्या वेगवेगळ्या रंगांनी ओळखल्या जात होत्या.

New road from private land to exit Virar station platform
विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
NHSRCL is working on Mumbai Ahmedabad bullet train project
बुलेट ट्रेनचा २१० मीटर लांबीचा पूल उभारला
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
Sleeper Vande Bharat Express , Sleeper Vande Bharat,
नागपूर, पुणे, मुंबईकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस
Indian Railway Highest Revenue Generating Train
Indian Railways : ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई १,७६,०६,६६,३३९; वंदे भारत, शताब्दी एक्सप्रेसलाही टाकले मागे

अंडरग्राउंड ट्रेन पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी धावली?

अंडरग्राउंड ट्रेन पहिल्यांदा लंडनमध्ये, पॅडिंग्टन आणि फायरिंग डॉन स्ट्रीट स्टेशनदरम्यान मेट्रोपॉलिटन मार्गावर धावली. त्याकाळी याला अंडरग्राउंड ट्रेन नाही तर ट्यूब ट्रेन म्हटले जायचे. तसेच आता आज ती मेट्रो, सबवे आणि रॅपिड ट्रेन म्हणून ओळखली जाते. १० जानेवारी रोजी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य लोकांसाठी ती सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी ४० हजार प्रवाशांनी अंडरग्राउंड ट्रेनमधून प्रवास केला.

अंडरग्राउंड ट्रेन फक्त लंडनमध्येच का चालवली गेली?

लंडनमध्ये अंडरग्राउंड ट्रेन सुरू करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. तसेच अंडरग्राउंड ट्रेन सुरू होण्यापूर्वीच शहराच्या चारही बाजूने रेल्वेस्थानके होती. तरीही लोकांना सेंट्रलपर्यंत पोहोचण्यास त्रास व्हायचा. दररोज हजारो लोक कामासाठी येत होते. अशा स्थितीत वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. १८५२ मध्ये या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. संशोधनानंतर समिती सदस्यांनी अंडरग्राउंड ट्रेन बांधण्याची कल्पना सांगितली. त्या काळातील सर्वात महागडे इंजिनिअर सर जॉन फॉलर यांच्याकडे अंडरग्राउंड ट्रेनची जबाबदारी देण्यात आली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी १० वर्षे लागली.

या अंडरग्राउंड ट्रेनच्या कल्पनेने लंडनच्या गर्दीमध्ये आणि व्यस्त जीवनात मोठी क्रांती घडवून आणली. त्यावेळी ही ट्रेन वाफेच्या इंजिनाने चालवली जात होती. यासाठी बोगद्यातून वाफ सहज बाहेर पडावी म्हणून हवेची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, १९०५ पासून अंडरग्राउंड ट्रेनही विजेवर धावू लागल्या.

भारतात अंडरग्राउंड ट्रेन कधी सुरू झाली?

भारतातील पहिली अंडरग्राउंड ट्रेन २४ ऑक्टोबर १९८४ रोजी कोलकत्ता मेट्रो अंतर्गत धावली होती. दम-दम ते टॉलीगंजदरम्यान ३.४ किमी लांबीच्या सेक्शनमध्ये ही ट्रेन सुरू झाली. कोलकाता मेट्रो ही भारतातील पहिली आणि आशियातील पाचवी मेट्रो सेवा होती. या ट्रेनमध्ये लाल रंगाचे आठ डबे होते. त्यानंतर दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ आणि जयपूरसह २३ शहरांमध्ये भूमिगत सेवा म्हणजेच मेट्रो सुरू करण्यात आली.

Story img Loader