भारतामध्ये दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास सोप्पा आणि खिश्याला परवडणारा असतो. त्यात लांबच्या पल्ल्यासाठी ट्रेन अधिक सोईस्कर असते. परिणामी असंख्य भारतीय प्रवास करण्यासाठी अन्य मार्गाऐवजी रेल्वेची निवड करतात. रेल्वेद्वारे दिल्या जाणाऱ्या फायद्यांमुळेच ट्रेनमध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळते. सणासुदीच्या दिवसांमध्ये तर प्रवाश्यांचे प्रमाण दुप्पट होते. भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळात रेल्वेप्रवासाची सुरुवात झाली होती. आज भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कंपैकी एक आहे. रेल्वेबाबत अशा असंख्य गोष्टी नियमितपणे रेल्वेचा प्रवास करणाऱ्या लोकांना ठाऊक नाही आहेत. फारश्या लोकांना माहीत नसलेली अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामान्य: प्रत्येक ट्रेन ही दोन रुळांवर धावत असते. पण जगामध्ये अशी एक जागा आहे, जिथे ३ रेल्वे रुळ पाहायला मिळतात. यांना ‘ड्यूएल रेल्वे ट्रॅक’ (Duall railway track) असे म्हटले जाते. या रेल्वे रुळांवर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गेज ट्रेन चालवण्यासाठी काम करत असतात. रेल्वेमध्ये काम करणारे कर्मचारी अशा पद्धतीच्या रुळाच्या पद्धतीला ‘मिक्स गेज’ म्हणातात. ब्रॉड गेज आणि मीटर गेज यांच्या एकत्र येण्याने मिक्स गेज तयार असते. यातील दोन गेज हे रेल्वे गेज असतात, तर एक सामान्य गेज असतो. अशा प्रकारचे ड्यूएल रेल्वे ट्रॅक म्हणजेच एकत्र असलेले ३ रेल्वे ट्रॅक्स भारताच्या शेजारील देशामध्ये बांगलादेशमध्ये पाहायला मिळतात.

आणखी वाचा – गाडीच्या मागे कुत्रे का धावतात आणि भुंकतात माहितेय का? यामागचे कारण जाणून थक्क व्हाल

रेल्वे रुळांची रचना ही त्यांच्या गेजवरुन ठरत असते. यामुळे बांगलादेशातील अनेक भागांमध्ये विविध आकारांचे रेल्वे रुळ पाहायला मिळतात. तेथील रेल्वे रुळांमध्ये सुरुवातीच्या काळात मीटर गेजचा वापर केला गेला होता. रेल्वे विभागाची वाढती व्याप्ती पाहता मीटर गेजच्या जागी ब्रॉड गेज लावण्याची गरज भासू लागली. पण असे करण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करावे लागणार होते. तेव्हा मीटर गेज काढण्याऐवजी त्याच्याबरोबर ब्रॉड गेज जोडण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे बांगलादेशमध्ये एकत्र असलेले ३ रेल्वे रुळ पाहायला मिळतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There are three railway tracks in bangladesh what is dual railway gauges know more yps