Horrible Animals: एखाद्या प्राण्याने एखाद्या व्यक्तीला संपूर्णपणे गिळंकृत केल्याची माहिती आजवर तुम्ही लोककथा, थरारक, काल्पनिक कथा किंवा काही ग्रंथांमध्ये वाचल्या असतील. एखादा प्राणी खरंच व्यक्तीला संपूर्णत: गिळंकृत करू शकतो ही गोष्ट कधीही कोणाला पटणार नाही. परंतु, जंगलातील काही प्राण्यांमध्ये खरोखरच मनुष्याला संपूर्णत: गिळंकृत करण्याची शारीरिक क्षमता असते.

गेल्या काही वर्षांत अजगर, मगरी आणि व्हेलसारख्या प्राण्यांच्या खऱ्या आयुष्यातील घटना पाहून निसर्ग आपल्या कल्पनेपेक्षाही अनोळखी आणि भयानक असू शकतो, ही गोष्ट लक्षात येते. आज आपण अशा प्राण्यांबाबत माहिती जाणून घेऊ, जे खरंच मनुष्यांना गिळंकृत करू शकतात. जरी असे प्राणी अत्यंत दुर्मीळ असले तरी, या प्राण्यांमध्ये आकार आणि शारीरिक अनुकूलता इतकी असते की, ते मानवाला संपूर्णत: गिळंकृत करू शकतात.

Ladki Bahin Yojana
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थ्यांना वगळले; या ‘निकषात’ बसणाऱ्या महिला योजनेतून बाहेर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Drunk Russian Woman tourist accident Raipur
मद्यधुंद रशियन महिला मांडीवर बसली आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, दुचाकीला धडक बसताच महिलेनं घातला गोंधळ
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

जाळीदार अजगर

शरीररचना आणि क्षमता : जाळीदार अजगर २० फुटांपेक्षा जास्त लांबीचे असू शकतात. त्यामुळे त्यांना जगातील सर्वांत लांब साप, असं म्हटलं जातं. त्यांचे लवचिक जबडे आणि शक्तिशाली आकुंचन यांमुळे ते त्यांच्या डोक्यापेक्षा लक्षणीयरीत्या मोठ्या भक्ष्याला गिळंकृत करू शकतात.

वास्तविक जीवनातील घटना : २०१८ मध्ये इंडोनेशियामध्ये वा टिबा नावाच्या ५४ वर्षीय महिलेला २३ फूट जाळीदार अजगराने संपूर्णत: गिळंकृत केले. गावकऱ्यांना तिचा मृतदेह त्याच्या पोटात आढळला. २०१७ मध्ये अकबर नावाच्या आणखी एका इंडोनेशियन पुरुषाला त्याच्या पाम तेलाच्या बागेत काम करताना अजगराने गिळंकृत केले होते.

हिरवा अॅनाकोंडा

शरीररचना आणि क्षमता : दक्षिण अमेरिकेतील मूळ असलेले हिरवे अॅनाकोंडा त्यांच्या जास्त वजनासाठी ओळखले जातात. काही हिरवे अॅनाकोंडा ५०० पौंडांपेक्षा जास्त वजनाचे असतात. ते त्यांच्या आकुंचन शक्तीचा वापर करून भक्ष्याला संपूर्णत: गिळंकृत करतात.

वास्तविक जीवनातील घटना : अ‍ॅनाकोंडा मानवाला गिळंकृत करत असल्याच्या खऱ्या घटना दुर्मीळ आहेत; परंतु हरणाइतक्या मोठ्या शिकारीला गिळण्याची क्षमता त्यांच्यात असते.

खाऱ्या पाण्यातील मगर

शरीररचना आणि क्षमता : २३ फूट लांबीपर्यंत वाढणाऱ्या, खाऱ्या पाण्यातील मगरी हे सर्वोच्च शिकारी आहेत, ज्या मोठ्या भक्ष्याला संपूर्णत: गिळण्यास सक्षम आहेत. त्यांचे शक्तिशाली जबडे हाडे मोडू शकतात आणि त्यांची पचनसंस्था कठीण पदार्थ पचवू शकते.

वास्तविक जीवनातील घटना : २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या उत्तर प्रदेशात पोहताना एका २४ वर्षीय महिलेवर खाऱ्या पाण्यातील मगरीने हल्ला करून तिला खाल्ले होते. आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलियातील असंख्य अहवालांमध्ये मासेमारी करताना किंवा पोहताना मगरींनी माणसांना खाल्ल्याचे आढळून आले आहे.

हंपबॅक व्हेल

शरीररचना आणि क्षमता : हंपबॅक व्हेल क्रिल त्यांच्या मोठ्या तोंडाचा वापर लहान माशांना फिल्टर करण्यासाठी करतात. त्यांचे घसे मानवांना गिळण्यासाठी खूप अरुंद असले तो तोडांमध्ये मनुष्यांना अडकवू शकतो.

वास्तविक जीवनातील घटना : २०२१ मध्ये मॅसॅच्युसेट्सजवळ एका हंपबॅक व्हेलच्या तोंडात लॉबस्टर डायव्हर मायकेल पॅकार्ड काही काळासाठी अडकला होता. ३०-४० सेकंदांनंतर तो बाहेर पडला. त्याला किरकोळ दुखापती झाल्या; पण तो बचावला. ही घटना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आणि नंतर ती एका माहितीपटाचा भाग बनली.

Story img Loader