Male Pregnancy in animals: पृथ्वीवर मानवाच्या प्रजातीव्यतिरिक्त असंख्य प्राणी, पक्षी आहेत. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्याप्रमाणे पुरुष आणि महिलांमध्ये महिलांना बाळाला जन्म देण्याचे वरदान लाभले आहे, त्याचप्रमाणे इतर सजीव प्राण्यांच्या जगात, गर्भधारणा ही सहसा मादीची भूमिका असते, परंतु पृथ्वीवर अशा काही अद्वितीय प्रजाती आहेत, ज्यात या प्रजातींमध्ये प्रजनन यश वाढवण्यासाठी नर गर्भधारणा विकसित झाली. गर्भधारणेचे नरांकडे स्थानांतर केल्याने, मादी कमी वेळेत जास्त अंडी निर्माण करू शकतात, ज्यामुळे संततीची संख्या जास्त होते, यामुळे गर्भ टिकवून ठेवण्यासाठी पितृत्वाची चांगली गुंतवणूकदेखील होते. परंतु, हे प्राणी नेमके कोणते? हे आपण जाणून घेऊ

‘हे’ नर प्राणी देतात बाळाला जन्म

समुद्री घोडे

समुद्री घोडे (हिप्पोकॅम्पस वंश) प्रामुख्याने उथळ उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण खारट पाण्यात जगभरात आढळतात. उत्तर अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत पॅसिफिक पाण्यात यांच्या चार प्रजाती आढळतात. समुद्री घोडे हे नर गर्भधारणेचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे. या समुद्री घोड्यांच्या पोटावर एक पिशवी असते, ज्यामध्ये मादी अर्थात आई समुद्री घोडा आपली अंडी घालते. साधारण ३० ते ५० दिवसांनी वडील एक-दोन नाही तर २०० चिमुकल्या पिलांना जन्म देतात.

पाईपफिश

समुद्री घोड्यांशी जवळून संबंधित असलेल्या, पाईपफिशमध्येदेखील नर गर्भधारणा होते. प्रजातीनुसार, नर फलित अंडी त्यांच्या शरीरावर बाहेरून किंवा ब्रूड थैलीमध्ये घेऊन जातात. थैली पोषक तत्वे आणि ऑक्सिजन प्रदान करते, ज्यामुळे गर्भाचा सुरक्षित विकास सुनिश्चित होतो. यांच्या जगभरामध्ये ५१ जाती व २३६ प्रजाती आढळून येतात. हे मासे खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातसुद्धा राहतात; तसेच ते उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण भागांमध्येसुद्धा राहतात.

समुद्री ड्रॅगन

समुद्री ड्रॅगन हा माशांचा आणखी एक गट आहे, जिथे नर मासे जन्म देतात. समुद्री घोड्यांप्रमाणे, समुद्री ड्रॅगनमध्ये नराला पूर्णपणे बंद पिशवी नसते. त्याऐवजी ते त्यांच्या शेपटीच्या खालच्या बाजूला फलित अंडी वाहून नेतात आणि अंडी बाहेर येईपर्यंत त्यांचे संरक्षण करतात. समुद्री ड्रॅगन हा टास्मानिया आणि दक्षिण आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या उथळ किनारी पाण्यात आढळणारा एक लहान मासा आहे. आकार आणि शरीराच्या आकारात हे प्राणी समुद्री घोड्यांसारखे दिसतात.

डस्की पाईपफिश

पाइपफिशचा एक विशिष्ट प्रकार, डस्की पाइपफिश हा नर गर्भधारणेचा एक मनोरंजक प्रकार आहे. या माशांमध्ये एक प्रगत ब्रूड पाउच असते, जे विकसनशील गर्भांसाठी ऑक्सिजन पातळीचे बारकाईने नियमन करते, ज्यामुळे ते पितृ गर्भधारणेच्या उदाहरणांपैकी एक आहेत.

गल्फ पाईपफिश

गल्फ पाईपफिश ही आणखी एक नर-गर्भवती प्रजाती आहे, जिथे नरांमध्ये एक गुंतागुंतीची थैली विकसित होते, जी सस्तन प्राण्यांच्या प्लेसेंटासारखी कार्य करते आणि वाढत्या गर्भासह पोषक तत्वांच्या देवाणघेवाणीवर नियंत्रण ठेवते. ती हे दर्शवते की संतती टिकवून ठेवण्यासाठी नर गर्भधारणा कशी विकसित झाली आहे.

रिबन पाईपफिश

रिबन पाईपफिश ही पाईपफिश कुटुंबातील एक दुर्मीळ प्रजाती आहे, ज्यांनी एक अद्वितीय नर गर्भधारणा प्रणाली स्वीकारली आहे. इतर पाईपफिशप्रमाणे नर अंडी वाहून नेतात आणि त्यांचे पालनपोषण करतात.

Story img Loader