भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याबद्दल लोकांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. एवढेच नाही तर अशा ठिकाणांचा इतिहास लोकांना खूप आवडतो आणि भारत असा देश आहे जिथे अशी अनेक ठिकाणे आहेत जी खूप वेगळी आहेत. तसेच, तिथली नावे देखील खूप वेगळी आहेत. यामध्ये भारतातील अशा अनेक रेल्वे स्थानकांचा समावेश आहे ज्यांचे नाव घ्यायलाही लोकांना लाज वाटते.
होय, भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेल्वे नेटवर्क असलेला देश आहे. येथे अशी काही रेल्वे स्थानके आहेत, ज्यांची नावे इतिहासातही नोंदवलेली आहेत, परंतु अशी काही स्थानके आहेत जी खूप विचित्र आहेत. ज्यांची नावं वाचून तुम्हालाही हसू येईल. चला तर मग जाणून घेऊया अशा रेल्वे तर स्थानकांची जी अतिशय वेगळी आहेत..
येथे पाहा रेल्वे स्थानकाची नावे..
फफुंद रेल्वे स्टेशन
फफुंद रेल्वे स्टेशन भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील औरैया जिल्ह्यातील दिबियापूर येथे आहे. या स्टेशनचे नाव ऐकून लोकांना हसू येते एवढेच नाही तर या स्थानकाचे नाव सांगायलाही लोकांना लाज वाटते. हे A ग्रेड श्रेणीचे रेल्वे स्थानक आहे. हे औरैया जिल्ह्याचे आणि दिबियापूर शहराचे मुख्य स्टेशन आहे.
टिटवाळा रेल्वे स्टेशन
मुंबईच्या सेंट्रल लाईनवरील हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे. हे स्थानक कल्याण ते कसाना दरम्यानच्या मार्गावर बांधले आहे. या स्थानकाचे नाव ऐकूनही लोकांना आश्चर्य वाटते. काहींना हसायला येते तर काहींना हे नाव घ्यायलाही लाज वाटते.
हलकट्टा रेल्वे स्टेशन
हे स्टेशन कर्नाटक राज्यात आहे. हे सेवालाल नगर जवळ आहे. येथून दररोज अनेक गाड्या जातात. हे नाव देखील खूप वेगळे आहे. हे नाव ऐकताच लोक चिडवायला लागतात. कारण हे नावे हलकट शब्दासारखे आहे.
( हे ही वाचा: भारतातील ‘या’ नदीला स्पर्श करायलाही लोकं घाबरतात; यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क)
कामागाटा मारू बज बज रेल्वे स्टेशन
कामगाटा मारू बज बज रेल्वे स्टेशन कोलकाता येथे आहे. हे भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे झोनमध्ये बांधले गेले आहे. हे पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यात आहे. इथले नाव खूप वेगळे आहे. अनेकांना हे नाव कसे उच्चारायचे हे देखील माहित नाही आणि काहींना ते बोलताना देखील लाज वाटते.
कुत्ता रेल्वे स्टेशन
कुत्ता नावाचे रेल्वे स्टेशन कर्नाटक राज्यातील गुट्टा या छोट्या गावाजवळ आहे. हे नाव देखील खूप अनोखे आहे, लोकांना हे नाव बोलायला लाज वाटते.
पनौती रेल्वे स्टेशन
या रेल्वे स्थानकाचे नाव ऐकताच लोक चिडवायला लागतात. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात पनौती हे एक छोटेसे गाव आहे. या रेल्वे स्टेशनचे नावं वाचून तुम्हालाही हसू येईल.