अनेकांच्या घरात आपल्याला सामान्यत: पांढऱ्या लाईट्स दिसतात. अगदी ट्यूब लाईट्सपासून बल्बपर्यंत सगळ्या लाईट्स पांढऱ्या रंगाच्या असतात. पांढरा प्रकाश पॉझिटिव्हीटी आणि प्रोडक्शनला प्रोत्साहन देतो. परंतु तुम्ही पाहिलं असेल की, हॉटेलमध्ये पांढऱ्या लाईट्सपेक्षा पिवळ्या लाईट्स जास्त वापरल्या जातात. मग ती खोलीत असो, कॉरिडॉर असो किंवा वॉशरूम. पण हॉटेल्समध्ये पिवळ्या लाईट्स नुसत्या शो म्हणून वापरल्या जात नाही तर त्यामागे अनेक कारणे आहेत. याच कारणांबद्दल आपण जाणून घेऊ…

हॉटेल्समधील वातावरण दिसते अगदी सुंदर

पिवळ्या लाईट्समधून निघणारा प्रकाश अतिशय सौम्य असतो, ज्यामुळे हॉटेलची अंतर्गत सजावट अधिक सुंदर दिसते. शिवाय, या लाईट्समुळे हॉटेलमधील अगदी लहान रुम मोठ्या आणि अधिक प्रशस्त दिसतात. हॉटेल्सचे वातावरण प्रेक्षणीय बनवण्याचे काम पिवळ्या लाईट्स करतात असे म्हणता येईल.

police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
massive fire breaks out at footwear shops in virar
विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग

आरामदायक वातावरण येतो अनुभव

पिवळा रंग हा उबदारपणा आणि आरामशी संबंधित आहे. हॉटेल्समधील वातावरण अगदी आरामदायी आणि स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी पिवळ्या लाईट्स वापरल्या जातात असेही त्यामागचे कारण आहे. पिवळा रंगामुळे खूप आरामदायी वाटते. यासह, तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते. विशेषत: जे ग्राहक लांबचा प्रवास करुन हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतात त्यांच्यासाठी या खूप फायदेशीर मानल्या जातात. पिवळ्या लाईट्समुळे चिडचिड होत नाही, जरी ह्या लाईट्स रात्रभर चालू राहिल्या तरी झोपेवर काही परिणाम होत नाही, पण पांढऱ्या लाईट्स याच्या उलट काम करतात.

झोपेची गुणवत्ता वाढते

पांढर्‍या लाईट्सपेक्षा पिवळ्या लाईट्स कमी तीव्रतेच्या असतात. ज्या कमी चकाकीसह मंद प्रकाश देतात. हॉटेलमध्ये येणाऱ्या ज्या ग्राहकांना अतितीव्र प्रकाश आवडत नाही त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर असते. याव्यतिरिक्त, पिवळा प्रकाशामुळे खोल आणि आरामदायी झोपे येते. झोपण्यासाठी ज्याप्रमाणे आरामदायी गादी असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे लाईट्सची भूमिका आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पिवळ्या लाईट्स मेलाटोनिनच्या उत्पादनावर परिणाम करतात, हा असा हार्मोन आहे जो झोप आणि जागण्याच्या चक्राचे नियमन करतो. या लाईट्स झोपेच्या गुणवत्तेला अधिक चांगले प्रोत्साहन देतात.

भारतात पर्यटन वाढत असताना हॉटेल्स आणि होमस्टेची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हॉटेल्स व्यावसायिक नव-नवीन प्रयोग करत आहेत. जेणेकरुन अधिकाधिक पर्यटक त्यांच्याकडे आकर्षित होतीत. यासाठी हॉटेल्स आणि होमस्टे केवळ सुंदर असणे आवश्यक नाही तर ते आरामदायी असणेही आवश्यक आहे. यामध्ये पिवळ्या लाईट्स मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरू शकतात.

Story img Loader