Cute But Dangerous Animals: जगातील कुठल्याही भयानक किंवा कुरूप दिसणाऱ्या गोष्टींना लोक घाबरून असतात. कारण अनेकांच्या मते, सौंदर्यच निसर्गातील सर्वात सुंदर आणि मोठी गोष्ट आहे. मग ते सौंदर्य एखाद्या सजीवाचे असो किंवा निर्जीव वस्तूचे. पण, लोकांचा हाच गैरसमज त्यांचा घात करू शकतो. सुंदर दिसणाऱ्या गोष्टीही अनेकदा घातक ठरू शकतात, अशा प्रकारची अनेक उदाहरणे आहेत. पण, आता प्राण्यांबद्दल बोलायचं झालं तर आपल्या मोहक सौंदर्याने अनेकांना मोहित करणारे काही प्राणी मानवांसाठी धोकादायक ठरू शकतात. पण, ते नेमके कोणते? हे आपण जाणून घेऊया..
सुंदर असले तरी घातक आहेत ‘हे’ प्राणी
स्लो लॉरिस
स्लो लॉरिस हा खूप निरागस दिसणारा प्राणी आहे, जो त्याच्या मोठ्या, मोहक डोळ्यांसाठी आणि सौम्य वर्तनासाठी ओळखला जातो. पण, हा निशाचर प्राणी विषारी आहे. स्लो लॉरिस त्याच्या कोपरातील ग्रंथींमधून विष स्रावित करतो, जे त्याच्या दातांमध्ये जाऊ शकते. तो चावल्याने मानवांमध्ये गंभीर ऍलर्जी होऊ शकते.
लाल कोल्हा
लाल कोल्हा त्याच्या तेजस्वी डोळ्यांनी आणि झुपकेदार शेपटीने मोहक वाटतो. पण, हा वन्य प्राणी आहे जो रेबीजसारखे आजार पसरवू शकतो, त्यामुळे त्याच्या जवळ जाणं घातक ठरू शकते.
डिंगो
ऑस्ट्रेलियाचा जंगली कुत्रा डिंगो दिसायला सामान्य असला तरीही त्याच्यात भक्षक प्रवृत्ती तीव्र आहे. शिवाय तो जर त्याच्या प्रदेशाचे रक्षण करत असेल तर तो धोकादायक ठरू शकतो.
प्लॅटिपस
प्लॅटिपस त्याच्या चोचीमुळे आणि खेळकर वर्तनामुळे अनेकांना आकर्षक वाटतो. पण, नर प्लॅटिपसच्या मागच्या पायांवर विषारी स्पर्स असतात, जे मानवांसाठी घातक ठरू शकतात.
टास्मानियन डेव्हिल
टास्मानियन डेव्हिल हा लहान प्राणी दिसायला गोंडस असू शकतो, परंतु या प्राण्याचा चावा सर्वात तीव्र असतो. प्रदेशाचे रक्षण करताना किंवा अन्नाच्या शोधात असताना तो अधिक आक्रमक होऊ शकतो.
पॉयझन डार्ट बेडूक
हा चमकदार रंगाचा बेडूक त्यांच्या तेजस्वी रंगछटांनी लक्ष वेधून घेतो, परंतु त्याच्या त्वचेवर असे शक्तिशाली विषारी पदार्थ असतात, जे प्राणघातक ठरू शकतात.