Prime Ministers Became Authors : एखाद्या देशाचे नेतृत्व सांभाळणे, हे खूप मोठे आव्हान असते. यासाठी राजकीय वैचारीक दृष्टिकोन नाही तर जीवनाच्या विविध पैलुंविषयी समज असायला पाहिजे. आतापर्यंतच्या इतिहासात अनेक पंतप्रधानांनी पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे विचार मांडले, अनुभव सांगितला. त्यातून त्यांचा देशाविषयीचा दृष्टीकोन स्पष्टपणे दिसून येतो. आज आपण साहित्य विश्वात प्रवेश केलेल्या काही पतंप्रधानांविषयी जाणून घेऊ या जे उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत पण तुम्हाला माहिती आहे का या खास यादीत दोन भारतीय पंतप्रधानांचा सुद्धा समावेश आहे. आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेऊ या.
सर विन्स्टन चर्चिल
ब्रिटीश इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होते सर विन्स्टन चर्चिल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पंतप्रधान असलेले सर विन्स्टन चर्चिल यांनी फक्त ब्रिटीश साम्राज्याचे नेतृत्वच केले नाही तर साहित्यातही महत्त्वाचे योगदान दिले. सहा खंडाचे ‘द सेकंड वार’ या पुस्तकात त्यांनी राजकारणी आणि इतिहासकार या दोन्ही दृष्टीकोनातून वर्णन केले आहे.
जवाहरलाल नेहरू
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे फक्त एक उत्तम नेतेच नव्हते तर एक अत्यंत कुशल असे लेखकही होते. त्यांच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात त्यांनी भारताचा समृद्ध असा इतिहास, संस्कृती आणि तत्वज्ञानाविषयी सुंदररित्या वर्णन केले आहे. तुरुगांत असताना लिहिलेले हे पुस्तक त्यांचे देशाबरोबर असलेले घनिष्ठ संबंध देशप्रेमाची भावना दर्शवते.
व्लादिमिर पुतिन
रशियन नेते व्लादिमिर पुतिन जगातील सर्वश्रेष्ठ नेत्यांपैकी एक आहे. त्यांनी रशियाचे पंतप्रधान म्हणून दीर्घकाळ सेवा केली.त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत ज्याद्वारे त्यांनी राजकीय तत्वज्ञान आणि जागतिक दृष्टीकोनाचे वर्णन केले आहे. ‘फर्स्ट पर्सन: ॲन अॅस्टोनिशिंगली फ्रँक सेल्फ-पोर्ट्रेट बाय रशियाज प्रेसिडेंट’ आणि ‘रशिया ॲट द टर्निंग पॉइंट’ ही त्यांची गाजलेली पुस्तके होती यासह त्यांनी जागतिक घडामोडींवर रशियाची भूमिका स्पष्ट करणारी आणि आणि राजकीय क्षेत्रातील अनुभव सांगणारे साहित्य सुद्धा लिहिलेले आहेत.
हेही वाचा : साप वारंवार जीभ का बाहेर काढतात? काय आहे या मागील नेमकं कारण, जाणून घ्या
ली कुआन यू
सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू हे एक कर्तबगार नेते म्हणून ओळखले जाते.प्रेम आणि भीतीमध्ये त्यांनी भीतीला अधिक पसंती दिली. सिंगापूर सारख्या सुंदर नयनरम्य देशाल घडवण्यात ली कुआर यू यांचे मोठे योगदान आहे ‘फ्रॉम थर्ड वर्ल्ड टू फर्स्ट: द सिंगापूर स्टोरी’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी सिंगापूरच्या प्रवासाचे सुंदर वर्णन केले आहे.
इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या इतिहासातील प्रमुख राजकारणी होत्या. फक्त राजकारणातच नाही तर साहित्य क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता. त्यांनी ‘माय ट्रुथ’ नावाचे आत्मचरीत्र लिहिले. या आत्मचरीत्रातून त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी, राजकीय अनुभवाविषयी आणि पुरुषप्रधान संस्कृतीत एक स्त्री म्हणून सामना केलेल्या आव्हानांविषयी स्पष्टपणे लिहिले आहे.
टोनी ब्लेयर
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांनी राजकारणावर आधारीत, नेतृत्वाविषयी आणि जागतिक समस्यांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.’अ जर्नी: माय पॉलिटिकल लाइफ’ त्यांनी या पुस्तकातून त्यांच्या कार्यकाळात ब्रिटनच्या देशांतर्गत धोरणांविषयी आणि परराष्ट्रीय धोरणांविषयी त्यांचा दृष्टीकोन मांडला आहे.