Third Umpire System in Cricket: क्रिकेट चाहत्यांसाठी थर्ड अंपायर हा नेहमीच चर्चेचा, उत्सुकतेचा आणि कधीकधी प्रचंड रागाचाही विषय राहिला आहे. प्रत्यक्ष मैदानावर दिसणारे दोन अंपायर आणि मैदानाबाहेर बसलेले ‘थर्ड अम्पायर’! हे थर्ड अम्पायर अर्थात तिसरे पंच यांची गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडू आणि मैदानावरील पंच या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर मदत घ्यावी लागली आहे. कधी बाद न दिलेला खेळाडू बाद आहे म्हणून विचारण्यासाठी गोलंदाजांना तर कधी बाद दिलेला खेळाडू बाद नाहीये म्हणून विचारणा करण्यासाठी फलंदाजांना या तिसऱ्या पंचांच्या मदतीची गरज पडली आहे. पण मुळात हे तिसरे पंच कधीपासून क्रिकेटमध्ये अस्तित्वात आले? कधीपासून ही मैदानाबाहेरच्या पंचांना निर्णय विचारण्याची पद्धत रुढ झाली?

तिसऱ्या पंचांनी दिलेले निर्णय हल्लीच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्य आधारे दिलेले असतात. मग ते स्निकोमीटर, हॉक आय किंवा अल्ट्राएज प्रणाली असो, बॉल ट्रॅकिंग असो किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या दोन, तीन किंवा चार बाजूंच्या अॅक्शन रिप्लेमध्ये दिसणारे व्हिडीओ असोत. थर्ड अम्पायर या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन मग आपला अंतिम निर्णय देतात. विशेष म्हणजे हे सगळं तिसऱ्या पंचांबरोबरच मैदानावरच्या मोठ्या स्क्रीनवर खेळाडू आणि प्रेक्षकांनाही दिसत असतं. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर शक्यतो आक्षेप किंवा वाद होत नाही. काही निर्णयांवर मात्र असे वाद होतात!

Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Pakistan become 1st team to whitewash South Africa at home in ODI bilaterals PAK vs SA
PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
Rohit Sharma and Akash Deep injured during practice sports news
रोहित, आकाश जायबंदी; चिंतेचे कारण नसल्याचे वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य
West Indies defeated by Indian women team sports news
भारतीय महिला संघाकडून विंडीजचा धुव्वा
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताचा सलामीवरी यशस्वी जयस्वालचा विकेटकीपरनं झेल घेतला. मैदानावरच्या अम्पायरनं त्याला नाबाद दिलं. पण तिसऱ्या पंचांकडे गेल्यावर त्यांनी त्याला बाद ठरवलं. चेंडू बॅटला स्पर्शून गेला की नाही, याबाबत स्निकोमीटरनं कोणताही संकेत दिला नसतानाही फक्त चेंडून बदललेली हलकीशी दिशा त्याला बाद ठरवण्यासाठी पुरेशी असल्याचं मत तिसऱ्या पंचांचं पडलं आणि त्यांनी यशस्वी जयस्वालला माघारी धाडलं. एकीकडे या निर्णयावर वाद चालू असताना ही तिसऱ्या पंचांची पद्धत कधीपासून सुरू झाली, हे पाहणं रंजक ठरेल!

सचिन तेंडुलकर आणि थर्ड अम्पायर!

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला प्रत्यक्ष मैदानावरच्या पंचांनी अनेकदा बाद दिल्याचा इतिहास आहे. यातल्या अनेकदा तो बाद नसूनही चुकीच्या निर्णयाचा फटका त्याला बसल्याचंही आता जगजाहीर आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की क्रिकेटच्या इतिहासात थर्ड अम्पायर पद्धत सुरू झाली, तेव्हा तिसऱ्या पंचांनी बाद दिलेला पहिला क्रिकेटपटू फलंदाजदेखील आपला सचिन तेंडुलकरच होता!

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालच्या विकेटमुळे चर्चेत आलेलं Snickometer तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय?

१९९२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात डर्बनच्या किंग्समेड मैदानावर कसोटी सामना खेळवला जात होता. खरंतर याआधीच्या काही सामन्यांमध्येही मैदानावरील दोन पंच आणि बाहेर बसलेले एक पंच अशी व्यवस्था होती खरी. पण मैदानाबाहेरच्या तिसऱ्या पंचांची निर्णयासाठी पहिल्यांदा मदत मात्र १९९२ च्या या सामन्यात घेतली गेली. तेव्हा तिसरे पंच होते कार्ल लिबेनबर्ग, निर्णयासाठी त्यांच्याकडे अपील करणारे मैदानावरचे पंच होते सिरिल मिचले आणि बाद होणारा क्रिकेटपटू होता सचिन तेंडुलकर.

कसा दिला पहिला निर्णय?

या सामन्यात सचिन तेंडुलकर धावबाद आहे की नाही? हे तपासण्यासाठी सिरिल मिचले यांनी लिबेनबर्ग यांच्याकडे मदत मागितली. लिबेनबर्ग यांनी टेलिव्हिजनवरचा अॅक्शन रिप्ले बघितला. त्यात सचिन तेंडुलकर धावबाद असल्याचं त्यांना दिसलं आणि त्यांनी तसा निर्णय दिला. आजच्या काळात ही बाब सामान्य वाटत असली, तरी १९९२ सालच्या त्या सामन्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे तिसऱ्या अंपायरनं अॅक्शन रिप्ले बघून एखाद्या खेळाडूला बाद दिलं होतं.

कसे होत गेले पद्धतीमध्ये बदल?

१९९२ साली थर्ड अंपायरने पहिला धावबाद निर्णय दिला. पुढे १९९७ सालापासून यष्टीचीत आणि चौकार किंवा षटकार गेलाय की नाही हे तपासण्यासाठीही तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाऊ लागली. २००१ साली टिपलेले झेल योग्य होते की नाही? हेही तिसरे पंच पाहू लागले. २००८ साली पहिल्यांदाच या व्यवस्थेसाठी DRS अर्थात Decision Review System सुरू करण्यात आली. यानुसार मैदानावरील खेळाडू मैदानावरील पंचांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देऊन तिसऱ्या पंचांकडे जाण्याची विनंती करू शकतात.

Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जैस्वाल आऊट की नॉट आऊट? तिसर्‍या पंचांच्या निर्णयावरून मतमतांतरं; पुन्हा एकदा भारताविरूद्ध चुकीचा निर्णय?

सामान्यपणे ज्या सामन्यांमध्ये डीआरएसचा वापर केला जातो, अशा एकदिवसीय आणि टेस्ट सामन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलतर्फे सहभागी दोन्ही देशांव्यतिरिक्त नागरिकत्व असणाऱ्या तिसऱ्या पंचांची नियुक्ती केली जाते. ज्या सामन्यांमध्ये डीआरएसचा वापर केला जात नाही, अशा सामन्यांमध्ये यजमान देशातील क्रिकेट व्यवस्थापन बोर्ड थर्ड अंपायरची नियुक्ती करते.

Story img Loader