आकाशात उडणारे रंगीबेरंगी सुंदर पक्षी खूप आकर्षक दिसतात. यातील काही पक्ष्यांना बघताच आपण त्यांच्या प्रेमात पडतो. त्यांचा रंग हा मोहून टाकणारा असतो. यामुळे काही जण आवड म्हणून घरात रंगीबेरंगी पक्ष पाळतात. या त्यातले काही पक्षी असे आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. डेन्मार्कमधील संशोधकांनी पक्ष्यांच्या अशा दोन प्रजाती शोधून काढल्या आहेत, ज्या आपल्यासाठी जीवघेण्या ठरत आहे. या दोन प्रजातीचे पक्षा त्यांच्या पिसांमध्ये न्यूरोटॉक्सिन लपवून ठेवतात. न्यूरोटॉक्सिन हे अशाप्रकारचे एक विष आहे ज्यामुळे ३० सेकंदात कोणाचाही मृत्यू होऊ शकतो.
या प्रजातींचे पक्षी न्यू गिनीच्या जंगलात आढळतात, असा दावा संशोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे हे पक्षी जे अन्न खातात ज्याचे नंतर विषामध्ये बदल होतो. ही क्षमता पक्ष्यांनी स्वत: विकसित केली आहे. हे पक्षी आपल्या पंखांमध्ये विष साठवून ठेवतात, ज्यामुळे ते इतर पक्षांपेक्षा वेगळे ठरत आहेत.
इंडो-पॅसिफिक क्षेत्राशी आहे पक्षांचे नाते
रीजेंट व्हिस्लर आणि रुफ्स नेप्ड बेलबर्ड या पक्षांच्या प्रजातींमध्ये विष आढळते. डेन्मार्कच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या नूड जॅनसेनच्या मते, न्यू गुयाना जंगलात आढळणाऱ्या या दोन्ही प्रजाती अतिशय खास आहेत. यातील रीजेंट व्हिसलर ही पक्षाची प्रजात एकेकाळी इंडो- पॅसिफिक प्रदेशात आढळत होती, यानंतर ती जगभर पसरली आहे. या पक्षांच्या पंखांमध्ये न्यूरोटॉक्सिन लपविण्याची क्षमता आहे, त्यामुळे वेळ येईल तेव्हा ते या विषाने कोणालाही मारू शकतात.
Most Expensive Fish : ‘हा’ आहे जगातील सर्वात महाग मासा? ज्याच्या खरेदीसाठी लागते बोली, किंमत तर…
हृदयविकाराचा झटक्याने होऊ शकतो मृत्यू
या पक्ष्यांना रंगीबेरंगी दिसणाऱ्या डार्ट फ्रॉगप्रमाणेच विष असते. जे दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळतात, या पक्षांना स्पर्श केल्यानंतरही मृत्यू होण्याचा धोका असतो. संशोधकांच्या मते, बॅट्राकोटॉक्सिन (न्यूरोटॉक्सिन) असणे हे अत्यंत धोकादायक लक्षण आहे. असा दावा केला जातो की, पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने ताबडतोब स्नायूंचा त्रास होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.
या पक्षांवर संशोधक कासुन बोडावट्टा यांनी सांगितले की, विषारी पक्षी पिसांमध्ये ठेवलेले न्यूरोटॉक्सिन नियंत्रित करू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा हा पक्षी अधिक हिंसक हल्ला करतो, तेव्हाच तो विष बाहेर फेकतो जे मृत्यूला कारणीभूत ठरते. यावर संशोधकांच्या टीमने पक्षी घातक न्यूरोटॉक्सिनचे नियंत्रण कसे करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर मूड जॅनसेन यांनी म्हटले कीस हे संशोधन फक्त सुरुवात आहे, आमची टीम हे पक्षी विषावर नियंत्रण कसे ठेवतात हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तसेत त्यांची मज्जासंस्था ते कसे साठवते हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.