आजकालचे इलेक्ट्रिक दिवे जेमतेम काही महिने, फार-फार तर वर्षभर व्यवस्थित टिकतात. मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात एक असा दिवा आहे जो तब्बल शंभर वर्षांपासून अखंड चालू आहे. हा कारबन फिलॅमेंट दिवा १९०१ सालापासून सुरू असून याचे नाव सेंटेनिअल ब्लब [Centennial Bulb] असे देण्यात आले आहे. हा खास दिवा अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरामधील लिव्हमोर अग्निशमन विभाग क्रमांक ६ येथे लावण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे, तर याची नोंद गिनीज बुकातही झालेली आहे. त्यांनी या दिव्याला, ” लाँगेस्ट बर्निंग लाईट ब्लब” म्हणजेच सर्वात जास्त काळासाठी सुरू असलेला दिवा असे नाव दिले आहे. शेलबी इलेक्ट्रिक कंपनीने १८९९ ते १९०० या काळात ओहायोमध्ये हाताने बनवलेला हा दिवा आहे आणि १९०१ साली लिव्हमोर पॉवर आणि पाणी कंपनीचे मालक डेनिस बेर्नल यांनी हा दिवा लिव्हमोर अग्निशमन दलाला दिला आहे, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखातून समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा