जगात आजही सगळ्यात जास्त प्यायले जाणारे पेय म्हणजे पाणी. पाण्यानंतर सर्वाधिक सेवन केल्या जाणाऱ्या पेयांमध्ये चहा व कॉफीचा क्रमांक लागतो. चहा व कॉफी ही अशी पेय आहेत, ज्यांचे जगभरात मोठया प्रमाणात सेवन केले जाते. भारतात कोणाच्याही घरी पाहुणे आले तर त्यांना चहा किंवा कॉफी पाजवल्याशिवाय पाठवत नाहीत.

हेही वाचा- Dunki Meaning : शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘डंकी’चा अर्थ काय? तुम्हाला माहितीये का?

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
pune mahametro loksatta news
‘महामेट्रो’कडून हवाईप्रवाशांसाठी विशेष सुविधा, कसा होणार फायदा?
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही

जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत जिथे नागरिक मोठ्या प्रमाणात कॉफीचे सेवन करतात. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. याअंतर्गत विविध देशांमध्ये किती प्रमाणात कॉफी प्यायली जाते याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉफी पिण्याच्या बाबतीत कोणता देश सर्वाधिक पुढे आहे व भारतात एक व्यक्ती रोज किती कप कॉफी पितो तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया…

हेही वाचा- झाडं का कोमेजतात? काय आहे यामागचे कारण, घ्या जाणून

या देशात प्यायली जाते सर्वाधिक कॉफी

फिनलँड हा युरोपिय देश कॉफीच्या वापरात अव्वल आहे. फिनलँडमधील सरासरी व्यक्ती दिवसातून ८-९ कप कॉफी पितात. काही ठिकाणी कपांची ही संख्या ३० पर्यंत पोहोचते. फिनलँड हा थंड देश आहे, म्हणूनच नेहमीपेक्षा जास्त लोक स्वतःला उबदार ठेवण्यासाठी इथे कॉफी घेतात. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर रिपोर्टनुसार, फिनलँडचा एक नागरिक एका वर्षात सरासरी ९.६ किलो कॉफी पितो.

हेही वाचा- आवडत्या व्यक्तीला प्रपोज करताना ‘या’ देशातील मुली शर्टचं दुसरं बटण का मागतात? जाणून घ्या

अहवालानुसार कॉफी पिण्याच्या बाबतीत फिनलँडनंतर नॉर्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॉर्वेमध्ये सरासरी व्यक्ती एका वर्षात ७.२ किलो कॉफी पितो, तर नेदरलँड तिसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँडमधील एक व्यक्ती दरवर्षी ६.७ किलो कॉफी पिते. फिनलँड, नॉर्वे, नेदरलँडमधील वातावरण अतिशय थंड असते; म्हणूनच या देशात कॉफी पिण्याचे प्रमाण जास्त आहे.

हेही वाचा- कासवांचं आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त कसं असतं? जगातील सगळ्यात म्हातारे कासव कोणते? घ्या जाणून

कॉफी पिण्याच्या बाबतीत स्विडन देशाचा चौथा नंबर लागतो. या देशात एक व्यक्ती दरवर्षी ६.५ किलो कॉफी पिते. त्यानंतर स्लोविनिया देशात कॉफी पिण्याचे प्रमाण ६.१ किलो आहे. ऑस्ट्रिया देशात एक व्यक्ती वर्षभरात ५.५ किलो कॉफी घेते. सेरबियामध्ये हे प्रमाण ५.४ किलो आहे, तर डेन्मार्कमध्ये एक व्यक्ती दरवर्षी जवळपास ५.३ किलो कॉफीचे सेवन करते. जर्मनीत प्रतिव्यक्तीमागे दरवर्षी ५.२ किलो कॉफीचे सेवन केले जाते. बेल्जियममध्ये हे प्रमाण ४.९ किलो आहे, तर ब्राझीलमधील नागरिक दरवर्षी ४.८ किलो कॉफी घेतात. बोस्निया-हर्जेगोविना देशात कॉफी सेवनाचे प्रमाण प्रतिव्यक्तीमागे ४.३ किलो आहे; तर एस्टोनियामध्ये एक व्यक्ती दरवर्षी ४.२ किलो कॉफी पिते.

भारतीय व्यक्ती एका दिवसात किती कप कॉफी पितात

फिनलँडमध्ये प्रत्येक व्यक्ती वार्षिक ९.६ किलो कॉफी पितात, तर नॉर्वेमध्ये ७.२ किलो आणि नेदरलँडमध्ये ६.४ किलो कॉफी पितात. या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतात कॉफी पिणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. भारतात, एक व्यक्ती एका वर्षात फक्त १०० ग्रॅम कॉफी घेते. मात्र, चहा पिण्याच्या बाबतीत भारत अनेक देशांपेक्षा खूप पुढे आहे.

Story img Loader