तुम्ही आतापर्यंत अनेक विचित्र गावांबद्दल ऐकले असेल. भारतातही असे एक गाव आहे, जे जगभर प्रसिद्ध आहे. या गावात तुम्हाला अनेक जुळी मुले पाहायला मिळतील. या गावाला जुळ्यांचे गाव म्हणतात. जुळी मुले आपण नेहमीच पाहतो, पण भारतात असे एक गाव आहे जिथे जुळी मुलेच जन्माला येतात. यामागील रहस्य कोणालाच माहीत नाही. तुम्ही आतापर्यंत अनेक विचित्र गावांबद्दल ऐकले असेल. भारतातही असे एक गाव आहे, जे जगभर प्रसिद्ध आहे. या गावात तुम्हाला अनेक जुळी मुले पाहायला मिळतील. या गावाला जुळ्यांचे गाव म्हणतात. इथे जवळपास प्रत्येक घरात जुळी मुले जन्माला येतात. भारतातलं हे कोणतं गाव आहे माहिती आहे का? चला जाणून घेऊ..

केरळमधील कोडिन्ही या दुर्गम गावात जुळ्या मुलांच्या २२० जोड्या आहेत. २००८ मध्ये ३०० महिलांनी निरोगी बाळांना जन्म दिला आणि त्यापैकी १५ जुळ्या बाळांचा जन्म झाला. लोकसंख्या जनगणनेनुसार, कोडिन्ही गावात गेल्या पाच वर्षांत ६० जुळ्या बाळांचा जन्म झाला. असे दिसून येते की, जुळ्या मुलांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. केरळमधील डॉक्टर डॉ. कृष्णन श्रीबिजू, ज्यांना जुळ्या मुलांच्या जन्मामागील विज्ञानाचा अभ्यास करण्यात रस आहे, ते गेल्या दोन वर्षांपासून कोडिन्हीमध्ये मोठ्या संख्येने जुळ्या मुलांच्या जन्माचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे मत आहे की, गावात जुळ्या मुलांची प्रत्यक्ष संख्या कागदपत्रांमध्ये अधिकृतपणे नोंदवलेल्या संख्येपेक्षा जास्त आहे.

डॉ. श्रीबिजू म्हणतात, “माझ्या वैद्यकीय मतानुसार कोडिन्ही गावाच्या हद्दीत सुमारे ३०० ते ३५० जुळे आहेत,” ते पुढे असेही म्हणतात, “दरवर्षी जुळ्यांची संख्या वाढत आहे हे आश्चर्यकारक आहे, इतके की गेल्या १० वर्षांत कोडिन्हीमध्ये जुळ्यांची संख्या दुप्पट झाली आहे असे मला वाटते.”

गावकरी म्हणतात की, जुळ्या मुलांची प्रसूती तीन पिढ्यांपूर्वी सुरू झाली. जुळ्या मुलांच्या वाढत्या संख्येच्या वैद्यकीय महत्त्वाबद्दल उत्साह व्यक्त करताना डॉ. श्रीबिजू म्हणतात, “माझ्या माहितीनुसार, हे वैद्यकीय चमत्कार ६० ते ७० वर्षांपूर्वी कुठेतरी सुरू झाले.” त्यांच्या मते, जुळ्या बाळांच्या जन्मामागील संभाव्य कारण गावकऱ्यांनी घेतलेले अन्न आणि पेय असू शकते. त्यांनी पुढे असेही म्हटले की, जर ते त्यांच्या गृहीतकांसह योग्य मार्गाने विचार करत असतील, तर इतक्या जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या घटकांवर मर्यादा घालता येतील आणि त्यांचा वापर वंध्यत्व असलेल्या लोकांच्या फायद्यासाठी करता येईल.

“भारतात, विशेषतः जुळ्या मुलांचे जन्मदर कमी असल्याने एका भारतीय गावात जुळ्या मुलांची संख्या जास्त असल्याचे पाहणे आश्चर्यकारक आहे. तसेच जुळ्या मुलांचा जन्म सामान्यतः वयस्कर, प्रौढ महिलांमध्ये होतो. कोडिन्हीमध्ये असे नाही, कारण येथे लग्न १८-२० वर्षांच्या वयात होते आणि त्यानंतर लगेचच कुटुंब नियोजन सरू होते”, असे डॉ. श्रीबिजू म्हणतात. जुळ्या मुलांच्या जन्मामागील आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, साधारणपणे ५ फूट ३ इंचांपेक्षा कमी उंची असलेल्या महिला जुळ्या मुलांना जन्म देतात. तथापि, कोडिन्हीमधील महिलांची सरासरी उंची ५ फूट आहे.

दरम्यान, डॉ. श्रीबिजू कोडिन्ही या सुंदर गावात झालेल्या प्रचंड जुळ्या मुलांच्या जन्मामागील कोडे सोडवण्यासाठी पुरेसे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Story img Loader