नव्या दशकासाठी जनगणनेच्या कामाला १ मे २०२० पासून सुरुवात होणार आहे. जनगणना कायदा कलम ८ च्या उपकलम १ नुसार होणार होत असलेल्या जनगणनेसाठी सरकारने सर्व जनगणना कार्यालयांना प्रश्नावली पाठवली आहे. रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून याची अधिकृत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
दरम्यान, जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रश्नांमध्ये घराच्या मालकाचे नाव, घर क्रमांक आणि घराच्या स्थितीसह अनेक प्रश्नांचा समावेश आहे.
- जनगणनेवेळी हे प्रश्न विचारले जातील
- इमारत क्रमांक (पालिका किंवा स्थानिक अधिकृत क्रमांक) काय?
- घर क्रमांक काय?
- घराचे बांधकाम करताना छत, भिंती आणि सिलिंगमध्ये मुख्यत्वे वापरण्यात आलेले साहित्य कोणते?
- घराचे बांधकाम कोणत्या कारणासाठी होत आहे ?
- घराची स्थिती काय?
- घराचा क्रमांक किती?
- घरात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या किती?
- कुटुंबप्रमुखाचे नाव काय आहे?
- कुटुंबप्रमुख स्त्री आहे की पुरुष?
- कुटुंबप्रमुख अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती किंवा इतर समाजातील आहेत का?
- घराच्या मालकी हक्काची स्थिती काय आहे?
- घरातील खोल्यांची एकूण संख्या किती?
- घरात किती लग्न झालेली जोडपी राहतात?
- पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत काय आहे?
- घरात पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता काय?
- वीजेचा मुख्य स्त्रोत काय?
- शौचालय आहे कि नाही?
- कोणत्या प्रकारचे शौचालय आहे?
- ड्रेनेजची व्यवस्था आहे का?
- घरात वॉशरुम आहे की नाही?
- स्वयंपाक घर आहे की नाही, त्यात एलपीजी किंवा पीएनजीची जोडणी आहे किंवा नाही?
- स्वयंपाक घरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधन कोणते?
- घरात रेडियो किंवा ट्रान्झिस्टर आहे का?
- टेलिव्हिजन सेट आहे का?
- इंटरनेटची सुविधा आहे की नाही?
- लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे की नाही?
- टेलिफोन किंवा मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन आहे का?
- सायकल किंवा स्कूटर किंवा मोटरसायकल किंवा मोपेड आहे का?
- कार किंवा जीप किंवा व्हॅन आहे का?
- घरात मुख्यत्वे कोणत्या धान्याचा खाण्यासाठी वापर केला जातो?
- मोबाईल क्रमांक (जनगणनेसंबंधी संपर्कासाठी)
प्रश्नावलीबाबत अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
First published on: 10-01-2020 at 12:56 IST
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This information to be provided for the census learn questionnaire aau