why brides apply mehndi on wedding day: लग्न, साखरपुडा, बारसं कोणताही सोहळा मेहंदी शिवाय पूर्ण होतच नाही. त्यामूळेच सर्वांना आवडणारी मेहंदी आर्टीफिशिअल जमान्यातही आपलं अस्तित्व टिकवून आहे. पण तुम्हाला माहिती आहे का लग्नात नववधूच्या हातावर मेहंदी का काढतात?, लग्नाआधी मेहंदी लावण्याचे खरे कारण नक्की काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर याविषयी विस्तृत जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐतिहासिक पार्श्वभूमी

मेहेंदी हा कलेचा सर्वात जुना प्रकार मानला जातो जो आतापर्यंत अस्तित्वात आहे. शास्त्रात, मेहंदीला सोळा श्रृंगारांपैकी एक मानले जाते. मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ‘मेहंदी’ हा शब्द ‘मेंधिका’ या संस्कृत शब्दापासून आला आहे, जो थेट मेहंदीच्या रोपाला सूचित करतो. मेहंदीचा वापर वैदिक युगापूर्वीचा आहे. ममीफिकेशनमध्ये मेहंदी वापरल्या जात असल्याच्या खुणाही सापडल्या आहेत. तसेच, असे मानले जाते की सुंदर राजकुमारी, क्लियोपेट्राने तिचे शरीर रंगविण्यासाठीही मेहंदी वापरली होती. लग्नाची परंपरा म्हणून, भारताच्या अनेक भागांमध्ये तसेच पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या शेजारील देशांमध्येही पंरपरा आहे.

जुनी भारतीय परंपरा

लग्नापूर्वी नवरी आणि नवरदेवाला मेहंदी लावणे ही सर्वात जुनी भारतीय परंपरा आहे. या समारंभात नवरीच्या हातांवर आणि पायावर मेहंदीच्या डिझाईन्स काढल्या जातात. स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनातील तो एक महत्वाचा घटक आहे. मेहंदीला प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते. त्याच्या रंगाबद्दल असे म्हटले जाते की, मेहंदीचा रंग जितका उजळ असेल. त्या वधूचा जोडीदार तिच्यावर तितकेच प्रेम करेल.

लग्नात नववधूच्या हातावर मेहंदी काढण्यामागचं महत्त्व

  • मेहंदीचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात होता. असे मानले जाते की, लग्नाच्या वेळी वधू आणि वर दोघेही खूप तणावाखाली असतात. मेहंदीची प्रकृती थंड असल्यामुळे ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते. म्हणूनच वधू-वरांना मेहंदी लावली जाते.
  • मेहंदी ही एक थंड पदार्थ आहे. ज्यामुळे लग्नकार्यातील दगदग आणि धावपळीतून आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. नवरी मुलगी तिच्या लग्नानंतर तिच्या सासरी जात असते. अशावेळी सहाजिकच तिच्या मनावर एकप्रकारचा ताण आलेला असतो. मात्र मेहंदीच्या थंडाव्यामुळे तिचा ताण कमी होण्यास मदत होते.
  • लग्नात नवरीचं रूप आणि सौंदर्य अधिक खुलून दिसावं हा यामागील प्रमूख हेतू असतो. कारण मेहंदीमुळे नववधूचे हात आणि पाय अधिक सुंदर आणि नाजूक दिसतात. हातापायावरील नाजूक मेहंदीच्या डिझाईनमुळे तिचे हाता-पाय इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसतात.
  • मेहंदी रंग जितका रंगत जातो तितकं तिच्या जोडीदाराचं तिच्यावरील प्रेम दृढ होत जातं असं मानलं जातं. यासाठीच प्रत्येक नववधूला तिच्या हातावरील मेहंदी रंग सर्वात गडद असावा असं वाटत असतं. हा एकमेकांवरील प्रेम करण्याचा एक सुंदर प्रकार असावा.
  • मेहंदीला एक विशिष्ठ प्रकारचा सुंगध असतो. ज्यामुळे लग्नानंतर तिच्या सहजीवनातही तसाच सुंगध निर्माण होतो. यासाठीच तिच्या हातावर सुंगधित मेहंदी काढली जाते. मेहंदीच्या सुवासाने तिचं वैवाहिक जीवन फुलतं आणि सुवासिक होतं असं म्हटलं जातं.
  • मेहंदी हे सौभाग्याचं लक्षण मानलं जातं यासाठी नवरीच्या हातावर मेहंदी काढली जाते. कुंकू, चुडा, सिंदूर याचप्रमाणे मेहंदी लावल्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडते. म्हणूनच लग्नाप्रमाणेच वटपौर्णिमा अथवा इतर सुवासिनी पुजनाच्या कार्यक्रमात मेहंदी अवश्य लावली जाते.

हेही वाचा – गुजरातमध्ये कारखालून ठिणग्या उडत असतानाही तो थांबला नाही, नंतर पाहिलं तर खाली….;VIDEO पाहून उडेल थरकाप

  • मेहंदी औषधी गुणधर्मांमुळे लग्नकार्यात नववधू आणि वराला मेंदी लावली जाते. या गुणधर्मांमुळे त्यांचे भावी आयुष्य निरामय आणि निरोगी राहते.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is why mehendi ceremony is so important for the bride to be before she starts her new journey how to apply mehendi on hand how can i make my mehndi hands darker srk