World’s most expensive water bottle: पाणी म्हणजेच जीवन! ‘जीवन’ या नावातच पाण्याचे महत्त्व दडलेले आहे. पाणी ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली भेट आहे. पाणी फार मौल्यवान आहे, ते जपून वापरले पाहिजे. पाणी नसले तर काय होईल, याची कल्पना दुष्काळातच येते. मानवी शरीर देखील ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. पृथ्वीवर सुमारे ७० टक्के पाणी देखील आहे, त्यापैकी फक्त २ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. साधारणपणे घरांमध्ये साधारण पाणी किंवा आरओचे पाणी वापरले जाते, पण मोठे सेलिब्रिटी वेगळे पाणी वापरतात. जे सामान्य आणि आरओ पाण्यापेक्षा खूप वेगळे आहेत आणि महाग देखील आहेत. काही क्षारयुक्त पाणी पितात तर काही परदेशातून पाणी आणल्यानंतर पितात.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या पाण्याबद्दल सांगत आहोत. भारतातील सर्वात श्रीमंत घराण्यातील सून नीता अंबानी देखील हे पाणी पितात, असे म्हटले जाते. हे पाणी इतके महाग आहे की त्याच्या एका बाटलीच्या किमतीत मुंबई-दिल्लीत आलिशान घर विकत घेता येते.

pm jay
काय आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना? नोंदणी कशी कराल? घ्या जाणून…
science behind crying
डोळ्यांतून अश्रू का येतात? काय आहे आपल्या रडण्यामागील…
**Why does the Earth appear flat despite being round?**
Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?
What Are Movable And Immovable property
Movable And Immovable Property : स्थावर व जंगम मालमत्ता म्हणजे नेमके काय? या दोन मालमत्तांतील फरक काय? जाणून घ्या, कायदा काय सांगतो?
Voting
मतदानासाठी वयाची अट कोणत्या साली आणि कोणत्या घटनादुरुस्तीने बदलली, हे तुम्हाला माहीत आहे का?
bag checking Do you know
Election Commission SOP : निवडणूक काळात नेते आणि स्टार प्रचारकांच्या बॅगा का तपासल्या जातात? व्यक्तीची झाडाझडती घेण्याचे अधिकार असतात का?
EPF Pension Scheme Eligibility
EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे
who can check helicopter and bags of political leader,
राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर अन् बॅग तपासणारे अधिकारी कोण असतात? एफएसटी पथक म्हणजे काय? जाणून घ्या!

पाण्याच्या बाटलीची किंमत किती?

जरी पाण्याचे मुख्य कार्य तुम्हाला हायड्रेट ठेवणे हे आहे, परंतु तुम्हाला हायड्रेट ठेवण्याबरोबरच जगातील सर्वात महाग पाणी देखील तुमची त्वचा तरुण ठेवते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, असं म्हटलं जातं. जगातील सर्वात महागड्या पाण्याचे नाव Acqua di Cristallo Tributo a Modigliani आहे. या पाण्याच्या बाटलीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २०१० मध्ये सर्वात महागड्या पाण्याची बाटली म्हणून नोंदवले गेले. त्याच्या एका बाटलीमध्ये ७५०ml पाणी असते, ज्याची किंमत सुमारे ५० लाख रुपये आहे. परंतु हे पाणी इतकं महाग कसं काय? तुम्हालाही प्रश्न पडला असेलच, मग जाणून घेऊया कारण…

(हे ही वाचा : गुलाब जामुनमध्ये ‘गुलाब’ नाही, ‘जामुन’चाही पत्ता नाही, मग असं नाव का पडलं? इंग्रजीत याला काय म्हणतात? )

पाण्याची बाटली महाग असण्याचे कारण काय?

Acqua di Cristallo Tributo a Modigliani water bottle बद्दल बोलायचे तर, ही जगातील सर्वात महागड्या पाण्याची बाटली आहे. ही बाटली सोन्याची आहे. या पाण्याचा उगम आइसलँड, फ्रान्स आणि फिजीमधील नैसर्गिक झऱ्यांमधून होतो. असे म्हटले जाते की, या पाण्यात ५ ग्रॅम सोन्याची राख मिसळली जाते, जे शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

ही पाण्याची बाटली दिसायला अतिशय आकर्षक आहे. हे लेदर पॅकेजिंगसह तयार केले जाते. या बाटलीचे डिझाईन फर्नांडो अल्तामिरानो यांनी तयार केले होते. तसे, या ब्रँडमध्ये अनेक पाण्याच्या बाटल्या येतात. जर आपण सर्वात कमी किमतीच्या पाण्याच्या बाटलीबद्दल बोललो, तर ती सुमारे $२८५ म्हणजेच सुमारे २१,३५५ रुपये आहे. पॅकेजिंग आणि डिझाइनमुळे ही पाण्याची बाटली महाग आहे, असे सांगितले जाते.