Interesting Death Facts: मृत्यू अटळ आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावेच लागते. मृत्यू हे जगातील काही न सुटलेल्या रहस्यांपैकी एक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्याच्या शरीराचे नेमके काय होते? मृत्यूशी संबंधित बरेच प्रश्न आहेत, ज्यावर वैज्ञानिकांनी बरेच संशोधन केले आहे. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नांशी संबंधित काही तथ्य सांगणार आहोत, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
शरीर बर्फासारखे थंड होते..
वैज्ञानिक भाषेत याला Algor एम म्हणतात. ही अशी स्थिती असते जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान झपाट्याने कमी होऊ लागते. सामान्यतः, मानवी शरीराचे तापमान ३७°C असते, परंतु मृत्यूनंतर ते ०.८°C/तास या वेगाने थंड होऊ लागते. याला सामान्य भाषेत शरीर थंड पडणे म्हणतात.
शरीर आकडणे
मृत्यूनंतर काही तासांनी शरीराच्या प्रत्येक भागात जडपणा येऊ लागतो. शारीरिकदृष्ट्या, हे एडेनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या पातळीत झपाट्याने घट झाल्यामुळे होते. पापण्यांमध्ये जडपणा आणि घशाच्या स्नायूंमध्ये कडकपणा यांपासून याची सुरुवात होते.
मृत्यूचा ‘हृदयावर’ काय परिणाम होतो?
एखाद्या व्यक्तीचे हृदय काम करणे बंद झाल्यावर डॉक्टर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगतात, हे तुम्ही नक्कीच पाहिले असेल. वास्तविक, जेव्हा हृदय काम करणे थांबवते, तेव्हा रक्त पंपिंग देखील थांबते आणि मानवी हृदयात रक्त भरू लागते. अशास्थितीत रक्तवाहिन्यांमध्येही रक्त भरते.
शरीराचा रंग बदलू लागतो
रक्तस्त्राव थांबताच शरीरात बदलाचा कालावधी सुरू होतो. शरीरात दोन रंग दिसू लागतात. शरीराचा खालचा भाग खूप स्थिर होतो आणि तो पिवळा किंवा पांढरा होऊ लागतो. तर शरीराचा वरचा भाग, जिथे रक्त साचते, लाल किंवा निळा दिसतो.
( हे ही वाचा: भारतातील ‘हे’ ३ रेल्वे मार्ग थेट परदेशात जातात; पहिल्या रेल्वेमार्गाचे नाव वाचून तुम्हीही थक्क व्हाल)
काही तासांनंतरही स्नायू जिवंत राहतात..
हे थोडं विचित्र वाटेल, पण मानवी स्नायू मृत्यूनंतर काही तास जिवंत राहतात. या कारणास्तव, कधीकधी एखाद्याच्या मृत्यूनंतर देखील शरीरात थोडीशी हालचाल किंवा स्पंदन दिसून येते.
शरीरातून आवाज येणे
मृत्यूनंतर, मानवी शरीर ताठ होऊ लागते, त्यामुळे विविध प्रकारचे आवाज देखील येतात. काहीवेळा हे आवाज ढेकरच्या स्वरूपातही दिसतात. अनेक वेळा रुग्णालयात मृत्यूनंतर हे आवाज ऐकून डॉक्टर आणि नर्सही थक्क होतात.
हाडे शेवटी संपतात..
मृत्यूनंतर थोड्याच वेळात शरीराचे विघटन होण्याची प्रक्रिया सुरू होते. जे एन्झाइम्स जिवंत असताना अन्न पचवण्यास मदत करतात, ते मृत्यूनंतर शरीराच्या अवयवांचे पचन करण्यास सुरवात करतात. शेवटी, आपल्या शरीरातील हाडे कुजतात. मृत्यूनंतर १०-२० वर्षांनी शरीरातील हाडे खराब होऊ लागतात.