Door of hell: जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याबद्दल जाणून प्रत्येकजण थक्क होईल. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत, ज्याबद्दल असे म्हटले जाते की, जर याठिकाणी कोणतीही व्यक्ती गेली तर ती पुन्हा जीवंत येत नाही. लोक या ठिकाणाला ‘नरकाचे द्वार’ म्हणतात. खरे तर ही गोष्ट एका मंदिराची आहे. हेरापोलिसमध्ये असलेले हे ठिकाण अनेक वर्षे रहस्यमय बनले होते, कारण लोकांचा असा विश्वास होता की येथे येणारे लोक यूनानी देवाच्या विषारी श्वासामुळे मरण पावतात. याला प्लुटोचे मंदिर, म्हणजेच मृत्यूच्या देवतेचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
अनेक वर्षांपासून असे मानले जात होते की मृत्यूच्या देवाच्या विषारी श्वासामुळे मंदिरात किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जाणाऱ्यांचा मृत्यू होतो. वारंवार होणाऱ्या मृत्यूमुळे या मंदिराला लोकांनी ‘नरकाचा दरवाजा’ असे नाव दिले आहे.
शास्त्रज्ञांनी उठवला या रहस्यमागील पडदा
मात्र, अनेक वर्षांनंतर शास्त्रज्ञांना वारंवार होणाऱ्या मृत्यूचे खरे कारण सापडले. वास्तविक, शास्त्रज्ञांनी सांगितले की या मंदिराच्या खालच्या दिशेने विषारी कार्बन डायऑक्साइड वायू सतत बाहेर पडतो. अशा परिस्थितीत माणूस किंवा प्राणी त्याच्या संपर्कात आल्यास त्याचा मृत्यू होतो. कार्बनडाय ऑक्साईड वायू इतका धोकादायक आहे की केवळ १० टक्के वायूने ३० मिनिटांत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. या मंदिराच्या गुहेत कार्बन डायऑक्साइडसारख्या विषारी वायूचे प्रमाण ९१ टक्के आहे.
( हे ही वाचा: भारतातील ‘या’ रहस्यमय दरीत गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही; ठिकाणाचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क)
‘हे’ शहर थर्मल स्पा म्हणून प्रसिद्ध होते.
वास्तविक, हेरापोलिस हे शहर पठारावर वसलेले एक प्राचीन रोमन शहर आहे. छोट्याशा जागेत या शहरात खूप वैविध्य आहे. येथे बनवलेले गरम पाण्याचे स्त्रोत हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. ते कॅल्शियमने समृद्ध आहेत आणि याठिकाणी पाण्याचे बुडबुडे सतत वाढत राहतात. म्हणूनच दुसऱ्या शतकात हे शहर थर्मल स्पा म्हणून प्रसिद्ध होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शहरात दूरदूरहून लोक त्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी येत असत. हे शहर विशेषत: सांधे आणि त्वचेशी संबंधित रोगांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध होते.