Prasad : तिरुपती मंदिरातील लाडूंची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आहे. याचं कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केलेला आरोप. आंध्र चे मुख्यमंत्री जगन रडे्डी तिरुपती मंदिरातील प्रसाद लाडूंमध्ये जनावरांची चरबी मिसळल्याचा आरोप झाला. आंध्रचे आत्ताचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा आरोप केला. यावरुन चांगलाच वाद रंगला आहे. तिरुपती मंदिरातील लाडू अशात प्रसाद म्हणजे नेमकं काय याचीही चर्चा सुरु झाली आहे. प्रसाद ( Prasad ) म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ.

प्रसाद म्हटलं की काय आठवतं?

प्रसाद ( Prasad ) म्हटलं की आपल्याला काय आठवतं? लाडू, पेढे, शिरा, केळं, एखादं फळ, गोड तीर्थ, साखर, खडीसाखर, बुंदी, चुरमा लाडू असे कितीतरी प्रकार आपल्याला आठवतील. आता खरंतर या प्रत्येक पदार्थाला काही ना काहीतरी नाव आहेच. मग त्या पदार्थाचा प्रसाद कसा काय होतो? देवाची मनोभावे पूजा केल्यानंतर त्याच्या समोर नैवैद्य ठेवला जातो. त्या नैवैद्याला प्रसाद असं म्हटलं जातं. प्रसाद हा वैदीक परंपरेतला महत्त्वाचा घटक आहे. कुठलीही पूजा किंवा धार्मिक महोत्सव प्रसादाशिवाय पूर्ण होत नाही. देवाला नैवैद्य दाखवला जातो आणि नंतर तो प्रसाद भक्षण केला जातो. त्यामुळेच त्याला प्रसाद ( Prasad ) म्हणतात.

हे पण वाचा- Tirupati Laddu Row : तिरुपती येथील लाडूच्या वादानंतर आता जगन्नाथ पुरी मंदिराने घेतला मोठा निर्णय, ‘या’ घटकाची होणार तपासणी

भगवद्गीतेत काय उल्लेख आहे?

भगवद्गीतेत हा उल्लेख आहे की मनापासून तुम्ही देवासमोर पाणी ठेवलंत तर त्याचाही प्रसाद ( Prasad ) होतो. अनेकांना वाटतं की प्रसाद म्हणजे देवापुढे ठेवण्यात येणारा कुठलाही गोड पदार्थ. पण फक्त गोड पदार्थ म्हणजे प्रसाद नाही. तुम्ही कुठल्याही पद्धतीचा शाकाहारी नैवैद्य देवापुढे ठेवलात तर त्याचा प्रसाद होतो. जसं की साईबाबांपुढे खिचडीचा नैवैद्य ठेवला जातो. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आहेत. आपण कुठलाही पदार्थ खाण्यापूर्वी देवाला नैवैद्य दाखवतो. तुझ्याच कृपेने आम्ही हे खाऊ शकतो आहे असं म्हणत कृतज्ञनता व्यक्त करतो. त्या नैवैद्याचा प्रसाद ( Prasad ) होतो, जो सगळे मिळून खातात. कृष्णभक्त विधी देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

प्रसाद म्हणजे नेमकं काय? वाचा सविस्तर (फोटो-लोकसत्ता)

प्रसादाच्या वेगवेगळ्या संकल्पना

प्रसादाच्या किंवा नैवैद्याच्या संकल्पना राज्या-राज्यांमध्ये वेगळ्या आहेत. तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर प्रसादाचा पदार्थ ठरतो. थंड वातावरणात दूध किंवा त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवैद्य दाखवला जातो. ज्या ठिकाणी फळं, भाज्या यांचं उत्पादन होतं तिथे लोक त्या त्या पद्धतीने देवाला नैवैद्य दाखवतात आणि नंतर तो प्रसाद आपसांत वाटून खातात. दहीहंडी साजरी होते तेव्हा दहीकाला केला जातो त्यालाही काला किंवा प्रसादच म्हटलं जातं त्याचं कारणही हेच आहे. प्रसाद या शब्दाचा अर्थ देवाला भक्तिभावाने दाखवलेला नैवैद्य होय.