व्हिडीओ म्हटल्यावर युट्यूब हे समीकरण आता पक्क झालं आहे. नुकतीच म्हणजेच २३ एप्रिल रोजी युट्यूबला १५ वर्षे पूर्ण झाली. दिवसोंदिवस युट्यूबचे महत्व अधिकच वाढताना दिसत आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण युट्यूबवर रोज कमीत कमी एखादा तरी व्हिडीओ पाहतोच पाहतो. मात्र रोज वापरत असलेल्या या युट्यूबबद्दलचे अनेक शॉर्टकट्स आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसतात. असेच काही युट्यूबचे खास फिचर्सबद्दल जाणून घेऊयात…
लॉग इन करा स्पीड वाढवा
गुगल अकाऊण्ट लॉगइन करुन सर्च केल्यास युट्यूबवरील सर्चचा वेग तर वाढतो. त्याचप्रमाणे लॉगइन करुन व्हिडीओ पाहताना रिस्ट्रीक्टेड व्हिडीओही पाहता येतात. युट्यूब ही गुगलचीच सेवा असल्याने तुम्ही तुमचे गुगल अकाउण्ट लॉगइन केल्यानंतर युट्यूबचा लॉगइनवाला अॅक्सेस मिळतो. लॉगइन केल्यानंतर तुम्ही दुस-यांच्या व्हिडीओवर कमेन्ट करू शकता तसेच स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड करू शकता. लॉगइन करून युट्यूब वापरल्याने युझर्सला सर्चमध्ये फायदा तर होतोच त्याशिवाय काही वेगळ्या ट्रिक्सही वापरता येतात.
ऑफलाइन युट्यूब
युट्यूबवरील व्हिडीओ पाहताना अनेकदा बफरींग होत राहते. कमी नेटवर्कमध्ये मोबाईलवर व्हिडीओ पाहताना ही समस्या प्राकर्षाने जाणवते. त्यामुळेच युट्यूबने नेट कनेक्शन नसताना व्हिडीओ पाहण्यासाठी युट्यूब ऑफलाइनची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक व्हिडीओच्या खाली ‘अॅड टू ऑफलाइन’ हा पर्याय देण्यात आला आहे. मात्र काही व्हिडीओ हे ऑफलाइन पाहता येत नाहीत. हे व्हिडीओ ऑफलाइन पाहण्यासाठी हव्या त्या रेझेल्यूशनमध्ये ते डाऊनलोड करता येता. ऑफलाइन व्हिडीओसाठी युट्यूबच्या अॅण्ड्रॉइड आणि आयस्टोअर अॅपमध्येही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
३६० डिग्री व्हिडीओ
आज अनेक युट्यूबर्स आपल्या कार्यक्रमांचे आणि इतरही व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करतात. मात्र त्यामध्ये अगदीच मर्यादीत दुष्ये पाहता येतात. त्यामुळेच युट्यूब ३६० डिग्री व्हिडीओच्या माध्यमातून पूर्ण परिसराचा वेध घेणारा व्हिडीओ अपलोड करता येतो. फक्त स्टेजवरील कलाकार बघण्यापेक्षा प्रेषक आणि तेथील एकंदरीत उत्साह आणि आनंदाचा अनुभव घर बसल्या घेता येतो. क्रोम किंवा मॅकवरून हे व्हिडीओ अपलोड करता येतात. कंप्युटरवर ३६० डिग्री मेटा डेटा अॅपच्या मदतीने हे भन्नाट ३६० डिग्री व्हिडीओ अपलोड करता येतात.
थ्री-डी व्हिडीओ
थ्री-डी का है जमाना म्हणत आज अनेक सिनेमे तसेच युट्यूबवरील व्हिडीओही थ्रीडीमध्ये अपलोड केले जातात. युट्यूबवर थ्री डी व्हिडीओ बघण्यासाठी www.youtube.com/3d या लिंकवर जाऊन अनेक थ्रीडी व्हिडीओ घरच्याघरी किंवा मोबाइलवरही पाहता येतात. व्हिडीओ खालील थ्रीडी आयकॉनवर क्लिक करून तुमच्याकडील थ्रीडी चष्म्यांप्रमाणे (लाल निळे किंवा इंटरव्हेल्ड) थ्रीडीचा प्रकार हवा तसा अॅडजेस्ट करून घेता येतो. तुम्ही तुमच्याकडील थ्रीडी कॅमेरा, मोबाईल्स, रेकॉर्डर यासारख्या व्हिडीओ रेकॉर्डरवरून थ्रीडी व्हिडीओ अपलोड करू शकता.
व्हिडीओची लिंक सेव्ह करून ठेवा
अनेकदा एखादा व्हिडीओ फक्त प्ले लिस्टमध्ये दिसतो आणि तो पाहण्यासाठी वेळ नसतो. मात्र नंतर शोधताना तो व्हिडीओ सापडत नाही अशा वेळस तुम्ही त्या व्हिडीओची लिंक सेव्ह करून ठेऊ शकता. यामुळे तुम्हाला तो व्हिडीओनंतर लगेच सापडतो. व्हिडीओ खालील अॅड टू या बटणावर क्लिक करून तुम्ही वॉच लेटरचा पर्याय निवडून हा व्हिडीओ तुमच्या खासगी प्ले लिस्टमध्ये साठवून ठेऊ शकता. हा सेव्ह केलेला व्हिडीओ पाहण्यासाठी स्क्रीनच्या उजवीकडील बाजूस असणा-या युझरनेमवर क्लिक करून वॉच लेटचा पर्याय सिलेक्ट करून पाहू शकता. व्हिडीओ लिस्ट पाहताना त्याच्या बाजूला असणा-या ‘+’ चिन्हावर क्लिक करून ते तुम्ही थेट वॉच लेटरसाठी सेव्ह करून ठेऊ शकता.
व्हिडीओतील एखादा ठरावीक क्षण पाहायचा असेल तर…
एखाद्या व्हिडीओमधील एकादा खास क्षण मित्राला पहायला सांगायचा असेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता. एखाद्या व्हिडीओमधील ठरावी मिनिटांला दिसणारी गोष्ट समोरच्याला दाखवायची असले तर व्हिडीओ शेअर बटण क्लिक केल्यानंतर युआरएलच्या खालील बाजूस असणा-या पर्यायांमधील स्टार्ट्स अॅट या पर्यायवर क्लिक करून व्हिडीओमधील तो सीन ज्या वेळेला आहे ती वेळ तेथे टाकावी (उदा पाच मिनिटाच्या व्हिडीओमधील ३:५५ सेंकदाला तो सीन असेल तर सार्ट अॅट ३:५५ म्हणावे. यामुळे मित्राला तो व्हिडीओ ३:५५ मिनिटापासून दिसेल.) तसेच व्हिडीओ एकाद्या ठराविक क्षणापासून पाहण्यासाठी युआरएलच्या शेवटी तुम्ही #t= वापरून त्या पुढे मिनिटे आणि सेकंद टाकू शकता.
उदा #t=3m55s
काही आठवड्यापूर्वी पाहिलेला व्हिडीओ
तुम्ही अनेकदा एखादा व्हिडीओ असाच सर्फ करताना पाहता आणि काही आठवड्याने तो पुन्हा पाहायचा असल्यास तो सापडत नाही. असे अनेकांबरोबर अनेकदा होते. अशा वेळेस तुम्ही व्ह्यूइंग हिस्ट्रीचा पर्याय वापरून http://www.youtube.com/my_history या लिंकवर वरून तो व्हिडीओ शोधू शकता. अकाऊण्ट लॉगइन करुन ही सुविधा वापरता येते.
व्हिडीओची प्ले लिस्ट करणे
एकामागे एका व्हिडीओ प्ले करण्यासाठी हा पर्याय वापरता येईल. व्हिडीओ खालील ‘अॅड +’ बटणवर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ प्लेलिस्टमध्ये टाकू शकता. तुम्हाला तुमच्या प्ले लिस्ट http://www.youtube.com/feed/playlists या लिंकवर दिसतील. यात तुम्ही व्हिडीओचा क्रम बदलू शकता. काही व्हिडीओ टाकू शकता किंवा काढूही शकता. प्ले ऑलच्या पर्यायाने तुम्ही सर्व व्हिडीओ एकामागे एक न थांबता प्ले करू शकता.
आणखी काही महत्वाचे शॉर्टकट्स
युट्यूब व्हिडीओच्या लिंकमध्ये youtube या शब्दाआधी ‘ss’ ही अक्षरे टाकल्यास तुम्हाला व्हिडीओ थेट डाऊनलोड करता येतो.
युट्यूब व्हिडीओच्या लिंकमध्ये youtube या शब्दाआधी gif टाकल्यास तुम्हाला सर्व व्हिडीओ जीफ फॉरमॅटमध्ये मिळतात.
युट्यूब व्हिडीओ आणि किबोर्ड शॉटकर्टस
K बटन प्रेस केल्याने तुम्हाला व्हिडीओ पॉज तसेच परत प्ले करता येतो.
J ने व्हिडीओ दहा सेकंद मागे तर L ने दहा सेकंद पुढे नेता येतो.
M ने व्हिडीओ म्युट होतो.