Car Tips: आता काही दिवसांतच उन्हाळा सुरु होईल. एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाळा जाणवत असतो. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांपासूनच तीव्र उन्हाळा जानव्याला लागला आहे. या काळामध्ये लोक आपल्या घरामध्ये एसी, कूलर लावतात. या शिवाय गाडीमधून प्रवास करणारे उन्हाळ्यात एसीचा जास्त वापर करतात. एरवी सुद्धा गाड्यांमध्ये एसीचा वापर होतो मात्र उन्हाळ्यामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपण त्याचे ब्रेक्स, इंडिकेटर्स आणि इतर गोष्टी व्यवस्थित सुरु आहेत ना हे आधी तपासून पाहतो. तसेच तुमच्या गाडीचा एसीसुद्धा नीट काम करतोय ना हे तपासून पहिले पाहिजे. कधी कधी एसी नीट काम करत नाही. जर का तुम्हाला वाटत असेल की तुमच्या गाडीच्या एसीने योग्य प्रकारे काम करावे तर आज आपण ५ टिप्स जाणून घेणार आहोत. ज्यमुळे टीमच्या गाडीचा एसी नीट काम करेल आणि तुम्हाला उन्हापासून वाचवेल.
हेही वाचा : Hyundai Creta नव्या अवतारात दाखल, कंपनी केवळ ‘इतक्याच’ गाड्या विकणार, किंमत…
फिल्टर स्वच्छ करावा
सर्व एसी हे सिस्टम फिल्टरसह येतात. जे सहसा कारच्या केबिनमध्ये असते. उन्हाळ्यापूर्वी , जेव्हा एसीचा वापर सर्वात जास्त केला जातो. तेव्हा हा फिल्टर बदलून घ्यावा. साफ करून घ्यावा. हे अतिशय सोपे काम असून यासाठी फार वेळी लागत नाही. फिल्टर साफ केल्यामुळे तुमच्या कारचा एसी हा योग्य प्रकारे काम करेल आणि त्याचे कूलिंग देखील फास्ट होईल.
एसीच्या सिस्टीमची तपासणी करावी
अनेक लोकं गाड्या वापरत असताना एसीच्या सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष करतात किंवा गडबडीमध्ये दुर्लक्ष होते. एसीचा नियमित वापर करणाऱ्या लोकांनी फक्त एसीचा फिल्टर बदलला तरी देखील पुरेसे आहे. मात्र ज्याच्या एसीचा वापर क्वचित होत असतो त्यांनी लिकेज, एसीची कुलंट लेव्हल आणि पूर्ण सिस्टीम तपासणे आवश्यक आहे.
तुमच्या कारची एअर कंडिशनिंग सिस्टम चांगली राहण्यासाठी एक महत्वाची टीप म्हणजे तुम्ही चार सुरु करताच ती फुल ब्लास्ट मोडमध्ये चालू करू नका. त्याऐवजी एसी चालू करण्यापूर्वी तुमची कार थोडी गरम होऊ द्या आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा सर्वात लहान सेटिंगपासून सुरुवात करा. आतमधील गरम हवा बाहेर जाण्यासाठी गाडीच्या काचा उघडा आणि नंतर हळूहळू एसी वाढवा . हा सल्ला थोडा जुना किंवा वेगळा वाटू शकतो पण याचा होणार परिणाम अत्यंत प्रभावी आहे.
उन्हाळ्यात कार पार्क करताना सावलीत पार्क करा. यामुळे एसी सुरू असताना कार लवकर थंड होते आणि कारचे केबिन थंड करण्यासाठी सिस्टिमला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.
तुम्ही शक्यो तुमच्या गाडीमधील एसी सिस्टीमचा नियमितपणे वापर करा. लेटेस्ट कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फिचर असते. जे कारमधील तापमान नियंत्रणामध्ये ठेवते. दररोज एसीचा वापर केल्याने त्यातील सर्व भाग हे चांगल्या स्थितीमध्ये राहण्यास मदत होते. त्यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही संबंधित गॅरेजमध्ये जाऊन ती अडचण सोडवू शकता.