Smartphone: अनेकदा स्मार्टफोन हरवतो अथवा चोरी गेल्याचे समोर येत असते. स्मार्टफोन चोरीला गेल्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र, सोबतच खासगी डेटा लीक होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे चोरीला गेलेला स्मार्टफोन मिळवायचा कसा असा प्रश्न निर्माण होतो. पण आता चोरीला गेलेला मोबाईलही आपल्याला सहजपणे ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी एक अँड्रॉइड अॅप आपल्याला उपयोगी पडणार आहे.
‘या’ अँड्रॉइड अॅपचा करा वापर
फोन चोरल्यानंतर चोरटे फोन स्विच ऑफ करुन त्यातील सिम कार्ड काढून टाकतात. त्यामुळे मग फोन ट्रॅक करणं अवघड जातं. त्यामुळे फोन चोरीला गेल्यानंतर पोलिसांची मदत घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण ‘Track it EVEN if it is off’ या अँड्रॉइड अॅपचा वापर करुन आपल्यालाही फोन ट्रॅक करणं सोपं जाणार आहे. अँड्रॉईड युजर्स हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. त्याचे रेटिंग देखील खूप चांगले आहे. हे हॅमर सिक्युरिटीने विकसित केले आहे. त्याची सेटअप प्रक्रिया अगदी सोपी आहे.
आणखी वाचा : Jio चा बंपर धमाका: ‘या’ प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळेल भरपूर डेटासह आणखी बरंच काही, पाहा काय आहे ऑफर
‘या’ मिळवा पध्दतीने स्मार्टफोन
अॅप डाउनलोड केल्यानंतर, ते उघडा आणि काही परवानग्या द्या. यात डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोडची सुविधा देखील आहे. यामुळे फोन स्वीच ऑफ केल्यानंतरही तो बंद होत नाही, तर चोराने फोन बंद केला आहे. हे अॅप फोनचे लाईव्ह लोकेशनही पाठवत राहतं. यामुळे त्याचा मागोवा घेणे खूप सोपे होते. तुम्हीही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी हे एक अतिशय उपयुक्त अॅप आहे. फोन चोरीला गेल्यास हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.