New Traffic Rules 2025: देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही जर नेहमीच वाहतुकीचे नियम तोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तीन नव्हे तर दहा पट दंड भरावा लागणार आहे. कारण नवीन मोटार वाहन दंड २०२५, १ मार्च २०२५ पासून लागू झाला आहे.
हेल्मेट घातलं नाहीतर इतका दंड
जर तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना आढळलात तर तुम्हाला १००० रुपये दंड आकारला जाईल. यासोबतच, ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल. पूर्वी, जर तुम्ही ही चूक केली तर १०० रुपये दंड आकारला जात होता. जर दोन पेक्षा जास्त लोक प्रवास करत असाल तर तुम्हाला १००० रुपये द्यावे लागतील.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे
जर तुम्ही दारू पिऊन गाडी ड्राईव्ह करत असाल तर १०,००० रुपये दंड आणि ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. पूर्वी हा दंड फक्त १,००० ते १५०० रुपयांच्या दरम्यान होता. जर तुम्ही पुन्हा असे करताना पकडले गेलात तर तुम्हाला १५,००० रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो
सीट बेल्ट
सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल. यापूर्वी यासाठी १०० रुपयांची तरतूद होती. दुसरीकडे तुम्ही सिग्नल तोडलात तर तुम्हाला ५०० रुपयांऐवजी तुम्हाला ५००० रुपये दंड द्यावा लागेल.
ड्रायव्हिंग लायसन्स
जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर ५०० रुपयांऐवजी ५००० रुपये दंड द्यावै लागणार आहे. तसेच जर तुम्ही इन्शुरन्सशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला २००० रुपये दंड आणि/किंवा तीन महिन्यांची तुरुंगवास होऊ शकतो.
१८ वर्षांपेक्षा कमी वय
जर मूल १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल आणि तो वाहन चालवताना आढळला तर त्याला २५,००० रुपये दंड आणि ३ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील १ वर्षासाठी रद्द केली जाईल. वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही.
ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर
जर तुम्ही गाडी चालवताना फोन वापरताना दिसलात तर तुम्हाला ५००० रुपये दंड होऊ शकतो. आधी हा दंड ५०० रुपये होता.
ट्रिपल रायडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग आणि रेसिंग
जर तुम्ही गाडीवर ट्रीप सीट जातांना पकडले तर, तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही डेंजरस ड्रायव्हिंग किंवा रेसिंग करताना पकडले गेले तर तुम्हाला ५००० रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्याबद्दल १०,००० रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल.
सिग्नल तुटणे आणि ओव्हरलोडिंग
नवीन नियमानुसार, सिग्नल तोडल्यास ५००० रुपये दंड आणि वाहन ओव्हरलोड केल्यास २०,००० रुपये दंड भरावा लागेल.
आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे
रुग्णवाहिकासारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला १०,००० रुपये दंड भरावा लागेल.