Tumbbad movie real village: तुंबाड हे रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. या गावाला मराठाकालीन इतिहास आहे. या गावाला लाभलेल्या परंपरांमुळे आणि जगबुडी नदीतील मगरींमुळे हे गाव ओळखले जाते. परंतु, २०१८ साली प्रदर्शित झालेल्या आणि आता पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’ या गूढ-हॉरर चित्रपटामुळे हे गाव परत एकदा चर्चेत आले आहे. या चित्रपटाने गावाच्या इतिहासाला एक काल्पनिक रंग दिला आणि हे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले.

गावाची भौगोलिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी:

तुंबाड हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. कोकण किनारपट्टीवरील पारंपारिक ग्रामीण जीवनाची सर्व वैशिष्ट्ये या गावात पाहायला मिळतात. गावातील सांस्कृतिक परंपरा आणि तिथल्या निसर्गाशी जुळलेली जीवनशैली हे या गावाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या गावाला समृद्ध अशी निसर्ग संपदा लाभलेली आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
vivek oberoi shifts in new home on 14th wedding anniversary
लग्नाच्या १४ व्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश! विवेक ओबेरॉयचं पत्नीला खास गिफ्ट, प्रियांका आहे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Shraddha Kapoor
Video: श्रद्धा कपूरच्या साधेपणाने जिंकले मन; अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “तिच्या संस्कारातून…”
IND vs NZ Harshit Rana called up to India Test squad, likely to make debut in Mumbai against New Zealand Mumbai Test
IND vs NZ: मुंबई कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल, या वेगवान गोलंदाजाची भारतीय संघात होणार एन्ट्री, पदार्पणाची मिळणार संधी
fight in Pimpri-Chinchwad and Maval is clear
पिंपरी-चिंचवड, मावळमधील लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती

अधिक वाचा:Tumbbad Sardar Purandare Wada: तुंबाड चित्रपटातील ‘तो’ चित्तथरारक वाडा नेमका आहे कुठे? त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय?

तुंबाड चित्रपटाचा प्रभाव:

२०१८ साली तुंबाड या चित्रपटाने या गावाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि कथानकातील अनोख्या आणि गूढ वातावरणाने सर्वांनाच प्रभावित केले. चित्रपटातील कथा एका प्राचीन खजिन्याभोवती फिरते, जो तुंबाड गावात दडला आहे, आणि या खजिन्याचा शोध घेणाऱ्यांच्या लोभापायी त्यांचे जीवन कसे उद्ध्वस्त होते याचे चित्रण केले आहे. हा चित्रपटाची कथा काल्पनिक कथा आहे. चित्रपटात गावाचे खरे अस्तित्व आणि प्राचीन दंतकथांचा वापर करून एक रोमहर्षक प्रवास साकारला आहे.

चित्रपट आणि वास्तवातील फरक:

चित्रपटात दाखवलेली कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि खऱ्या तुंबाड गावाशी तिचा संबंध नाही. चित्रपटातील दंतकथांमध्ये दाखवलेली देवता “हस्तर,” आणि त्या संदर्भातील कथा या सर्व लेखकांच्या कल्पनेतून साकारलेल्या आहेत. परंतु, चित्रपटाच्या यशामुळे हे गाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आणि लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

तुंबाड गावाचे सांस्कृतिक महत्त्व:

खऱ्या तुंबाड गावात लोक पारंपरिक शेती, फळबागा, आणि ग्रामीण व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत. गावातील सण, उत्सव, आणि धार्मिक परंपरा या सर्व गोष्टींनी गावाची सांस्कृतिक ओळख कायम राखली आहे. स्थानिक लोकांच्या जीवनशैलीत, निसर्गाशी एकरूप झालेली साधी जीवनशैली दिसून येते. तुंबाड हे गाव एक साधे, परंतु सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असे गाव आहे, या गावाला प्राचीन इतिहास आहे. परंतु तो इतिहास चित्रपटात दाखवलेल्या काल्पनिक कथांपेक्षा वेगळा आहे. तुंबाड चित्रपटाने या गावाला प्रसिद्धी मिळवून दिली, परंतु गावाचे खरे सौंदर्य त्याच्या पारंपारिक जीवनशैलीत आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये आहे.

Story img Loader