Indian Railway News : भारत देशात हजारो किमी अंतरावर रेल्वेमार्गाचे जाळे पसरले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत रेल्वेचा प्रवास करायला भारतीय नागरिकांना नेहमीच आवडतं. पण रेल्वे स्टेशनवर दिवसेंदिवस वाढणारी वर्दळ पाहता, लोकांची रेल्वे ट्रेनमधून प्रवास करताना दमछाक होते. अशा परिस्थितीत एकाच जागेवर जर दोन वेगवेगळी रेल्वे स्टेशन बांधण्यात आली असतील, तर प्रवाशांचा किती गोंधळ उडत असेल, याचा अंदाजही लावता येणार नाही. भारतातील महाराष्ट्रात अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होते. एकाच जागेवर दोन वेगवेगळी रेल्वे स्टेशन असल्यामुळं प्रवाशांचा गोंधळ होतो.
जगातील फक्त या ठिकाणी एकाच जागेवर आहेत दोन रेल्वे स्टेशन
श्रीरामपूर आणि बेलापूर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असलेली दोन वेगवेगळी रेल्वे स्टेशन आहेत. दोन रेल्वेमार्गावर असलेली ही रेल्वे स्टेशन एकाच ठिकाणी आहेत. परंतु, हे रेल्वे स्टेशन रेल्वे रुळाच्या विरुद्ध दिशेला आहेत. बेलापूर आणि श्रीरामपूर शहरापासून ५ किमी अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. औरंगाबाद, शिर्डी आणि अहमदनगर या रेल्वे स्टेशनशी जोडले गेले आहेत. रेल्वे स्टेशन प्रवरा मेडिकल ट्रस्टपासून २५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रवास करणे सोईस्कर होते.
ट्रेन पकडताना प्रवाशांचा होतो गोंधळएक रेल्वे स्टेशन उजव्या बाजूला असून दुसरा रेल्वे स्टेशन डावीकडे असल्याची माहिती आहे. एखादा प्रवासी पहिल्यांदाच या रेल्वे स्टेशनवर आला, तर त्याचा पुरता गोंधळ उडतो. चुकीच्या ट्रेनने प्रवास तर केला नाही ना? असा प्रश्नही काही प्रवाशांना पडतो. महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये एक स्टेशन खूप लोकप्रिय आहे. तिकिट काढण्याआधी प्रवाशांनी ट्रेन कोणत्या स्थानकावर जाणार आहे, याची खात्री करुन घ्यावी. कारण श्रीरामपूर आणि बेलापूर स्टेशन एकाच जागेवर आहेत. ही दोन्ही रेल्वे स्टेशन टॅकच्या विरुद्ध दिशेला आहेत. भारतीय रेल्वे जगातील दुसऱ्या क्रमांकाच सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. भारतात जेवढे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, तेवढी ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आहे, असंही बोललं जातं.