Types of Leave : Types of Leave : सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी रान्या राव या अभिनेत्रीला अटक करण्यात आली. त्यानंतर आता तिचे सावत्र वडील डीजीपी रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. शनिवारी संध्याकाळी हा आदेश जारी करण्यात आला. काय असते सक्तीची रजा? रान्या रावच्या वडिलांना म्हणजेच डीजीपी रामचंद्र राव यांना सक्तीची रजेवर पाठवण्यात आलं आहे. सक्तीची रजा म्हणजे काय? आपण समजून घेऊ.

सक्तीची रजा म्हणजे काय?

सक्तीची रजा म्हणजे काही वाद किंवा प्रकरण निर्माण झालं ते राजकीय, गुन्ह्यांशी संबंधित असेल तर त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येतं.

ही रजा साधारण २ महिने ते १२ महिन्यांपर्यंत असते. या कालावधीत पगार दिला जात नाही.

बाकीच्या रजा या अर्ज केल्यानंतर कर्मचाऱ्याला मिळतात. मात्र सक्तीच्या रजेचा निर्णय त्या त्या खात्याकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्यात येतो.

रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांची सावत्र मुलगी सोन्याच्या तस्करीत अडकल्याने आणि त्यांनी तिला मदत केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

रजेचे प्रकार कुठले असतात? Types of Leave

सक्तीची रजा वगळली तर कर्मचाऱ्यांसाठी रजेचे विविध प्रकार ( Types of Leave ) आहेत.

१) अर्जित रजा : कर्मचाऱ्यांना अर्ज केल्यानंतर मिळणारी रजा ही अर्जित रजा असते. या रजेचा कालावधी २० दिवसांपर्यंतचा असतो. १९९५ पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना सेवेत एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही रजा ( Types of Leave ) घेता येते. त्यानंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांचा प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर ही रजा घेता येते.

२) किरकोळ रजा : शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, विविध खात्यांमधले सरकारी कर्मचारी यांना वर्षभरातून ८ ते १० दिवसांची किरकोळ रजा असते. या दरम्यान जर रविवार किंवा सुट्टी आली तर तो भाग किरकोळ रजेचा भाग असते

३) प्रसुती रजा : स्थायी महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची पगारी रजा मंजूर होते. ही रजा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठीही असते. ही रजा वाढवायची असल्यास पुढे ती अर्ध पगारी होते.

४) असाधारण रजा (बिनपगारी) : कुठल्याही कारणाशिवाय घेतलेली रजा ( Types of Leave ) ही असाधारण रजा म्हणून ओळखली जाते. या रजेमध्ये कुठल्याही प्रकारे पगार मिळत नाही. या रजेला बिनपगारी किंवा अनपेड लिव्ह असंही संबोधलं जातं.

५) विशेष अर्जित रजा : मुख्याध्यापक, वरिष्ठ अधिकारी किंवा तत्सम पदांवरचे अधिकारी यांनी विशेष विनंती केल्यानंतर मिळणाली रजा म्हणजे विशेष अर्जित रजा होय.

रजेचे अन्य प्रकार कुठले असतात?

१) रक्तदान केल्यास १ दिवस

२) नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास ६ दिवस

३) स्त्रिया- निर्बिजीकरण गर्भाशय शस्त्रक्रिया (बाळांतपणा व्यतिरिक्त १४ दिवस)

४) गर्भस्त्राव किंवा गर्भपात या बाबत रजा सहा आठवड्यांपर्यंत

५) कुत्रा चावल्यास – तीन आठवड्यांपर्यंत

६) क्षय / कर्करोग / पक्षघात या साठी सर्व प्रकारच्या रजा संपल्या नंतरच १ वर्षापर्यंत पूर्ण पगारी रजा दुसऱ्या वर्षी अर्धपगारी व तीसऱ्या वर्षी असाधारण रजा (बिन पगारी) या साठी मात्र सिव्हीलसर्जन यांचा दाखला प्रत्यक ४ महिन्यात सादर करणे आवश्यक असतं. http://www.emahagov.com या वेबसाइटने ही माहिती दिली आहे.