दररोजच्या धावपळीच्या जीवनामुळे प्रत्येकाचं आयुष्य गुंतागुतीचं झालं आहे. यामुळे तणावाचं प्रमाण वाढलं आहे. हाच तणाव दूर करून मन शांत, एकाग्र आणि आनंदी ठेवण्यासाठी दररोज मेडिटेशन करणं खूप गरजेचं झालं आहे. भारतात हजारो वर्षांपासून मेडिटेशन आणि योग केला जातो. मेडिटेशन आणि योग हे जीवन योग्य प्रकारे जगण्याचं उत्कृष्ट साधन आहे. २१ डिसेंबरला ‘जागतिक मेडिटेशन दिवस’ साजरा केला जातो. यानिमित्ताने आपण मेडिटेशन प्रकार किती आहेत आणि कोणते मेडिटेशन तुमच्यासाठी फायदेशीर आहे? हे जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेडिटेशनचे प्रकार

Meditation

माइंडफुलनेस मेडिटेशन ( Mindfulness Meditation )

या मेडिटेशनमुळे तुम्हाला तुमचे वर्तमान क्षण नियंत्रित करता येतात. तसंच विचार, भावना आणि शारिरीक संवेदनांचं निरीक्षण आणि नियंत्रण करता येतं. शिवाय श्वास, विचारांवर नियंत्रण ठेवून लक्ष केंद्रित करता येतं. यामुळे तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते.

करुणा मेडिटेशन ( Karuna Meditation)

या मेडिटेशनचा मूळ हेतू स्वतःबद्दल, इतरांबद्दल प्रेम, दयाळूपणा आणि करुणेच्या भावना विकसित करणं आहे. हे मेडिटेशन आपल्या प्रिय व्यक्ती आणि ज्यांच्याशी पटत नाही अशा कोणत्याही व्यक्तीबद्दल सद्भावना व्यक्त करायला शिकवतं. तसंच हे मेडिटेशन आपल्याला सहानुभूती, प्रेम वाढवायला आणि नकारात्मक दूर करण्यास मदत करतं. तसंच संवेदनशील भावना विकसित करतं.

हेही वाचा – कांदा तुम्हाला का रडवतो? जाणून घ्या कारण…

कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन ( Concentration Meditation )

या मेडिटेशनमध्ये एका बिंदूवर लक्ष केंद्रीत केलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहत राहणं. तसंच तुमच्या आवाजावर किंवा श्वासावर लक्ष केंद्रीत करणं. यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनात एकाग्रात वाढवण्यास मदत होते. विद्यार्थ्यांसाठी हे मेडिटेशन खूप चांगलं आहे.

झेन मेडिटेशन ( Zen Meditation )

झेन मेडिटेशन किंवा झझेन हे बौद्ध धर्मातील एक ध्यानाचा प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला विशिष्ट मुद्रेत बसावं लागतं. श्वासावर लक्ष केंद्रित करावं लागतं. शांतता आणि अंतर्दृष्टीच्या खोल भावेनासाठी हे मेडिटेशन खूप आवश्यक आहे.

विपश्यना मेडिटेशन ( Vipassana Meditation )

भारतातील सर्वात प्राचीन मेडिटेशनपैकी एक विपश्यना मेडिटेशन आहे. यात मनात खोलवर लक्ष केंद्रीत केलं जातं. यातून आत्मज्ञान आणि मुक्ती मिळते. हे एक अतिशय आव्हानात्मक मेडिटेशन आहे जे शरीर आणि मनाला अनेक फायदे देखील देतं.

हेही वाचा – India Railways : ट्रेनच्या डब्यावर H1, H2, A1 का लिहिलेले असते? याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

लविंग काइंडनेस मेडिटेशन ( Loving Kindness Meditation )

या मेडिटेशनमुळे प्रत्येकाप्रती प्रेमाची भावना विकसित होते. तसंच राग आणि आव्हानांना कसं सामोरं जायचं या मेडिटेशनमधून शिकता येतं.

मंत्र मेडिटेशन ( Mantra Meditation )

मन एकाग्र करण्यासाठी हे मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. यात एखाद्या मंत्राचा जप करत आपल्या मनावर लक्ष केंद्रित केलं जातं. जगभरातील अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये या मेडिटेशनचा समावेश आहे. हे मन शांत करण्यास, तणाव कमी करण्यास, आध्यात्मिक वाढ आणि शांतीची भावना वाढविण्यास मदत करतं.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Types of meditation and which posture of meditation will be beneficial for you pps