What Is Brain Flossing: सध्या जगभरात ब्रेन फ्लॉसिंग हा चर्चेता विषय ठरत आहे. डेंटल फ्लॉसिंगमध्ये आपण जशी तोंडाच्या आरोग्याची काळजी घेतो, त्याच पद्धतीने आपण ब्रेन फ्लॉसिंगद्वारे आपण आपल्या मेंदूतील ताण किंवा मानसिक दबाव दूर करतो. जेव्हापासून आपण आभासी जगाच्या जवळ आलो आहोत, तेव्हापासून शारीरिक श्रमापेक्षा मानसिक श्रमाकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. तज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत, तणाव कमी करण्यासाठी ब्रेन फ्लॉसिंग हे एक उत्तम साधन ठरू शकते.
ब्रेन फ्लॉसिंग म्हणजे काय?
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते ब्रेन फ्लॉसिंग ही मानसिक आरोग्याची एक स्थिती आहे जी तुमचे मन स्वच्छ करण्याच्या कल्पनेने प्रेरित आहे. यासाठी आजच्या अशांत, सतत बदलणाऱ्या वातावरणात, ८डी ऑडिओ खूप मदत करू शकतो.
काय असतो ८ डी आवाज?
८डी म्हणजे ८ दिशांनी येणारा आवाज. यामध्ये, संगीत ऐकताना तुम्ही दुसऱ्याच जगात हरवून जाता. ८डी ऑडिओमुळे असे वाटते की संगीत एका कानातून दुसऱ्या कानात वाहू लागले आहे किंवा तुमच्या डोक्याभोवती फिरत आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मेंदूतील नको असलेल्या गोष्टी काढून टाकत आहात अशी भावना निर्माण होते.
८डी ऑडिओ हा ऑडिओ इंजीनिअरींगचा एक प्रकार आहे, जो ऐकण्याचा अनुभव अधिक समृद्ध करतो, जिथे तुमच्या आजूबाजूला आवाज येत असल्यासारखे जाणवते. हे मेंदूच्या दोन्ही गोलार्धांना सक्रिय करते, ज्यामुळे विश्रांती मिळते.
ब्रेन फ्लॉसिंग कसे करायचे?
तज्ज्ञांच्या मते, ब्रेन फ्लॉसिंग करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ८डी ऑडिओ कंटेंट आणि ट्रॅक निवडणे, जे ऑनलाइन म्युझिक अॅप्सवर सहज उपलब्ध आहेत. यासाठी तज्ज्ञ हेडफोन वापरण्याचा सल्ला देतात. हेडफोनमुळे तुम्हाला ध्वनींच्या दिशात्मक हालचाली अनुभवण्यास मदत होते.
ज्यांनी हे करून पाहिले आहे त्यांच्या मते, जिथे तुम्ही व्यत्यय न येता आराम करू शकता अशा आरामदायी आणि शांत जागेत बसून ब्रेन फ्लॉसिंग केल्याने या मेंदूवर सर्वोत्तम परिणाम होतो.
म्युझिक आणि जागा निवडल्यानंतर डोळे बंद करा आणि ध्वनींच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचे मन स्वच्छ होईल आणि तुमच्या शरीराला आराम मिळेल. विशेषतः तणावाच्या वेळी किंवा मानसिक स्पष्टता शोधत असताना, तुम्ही या पद्धतीचा वापर केल्यास तुम्हाला मानसिक स्थिती उत्तम राखण्यासाठी फयदा होईल.