भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे विविधतेत एकता पाहायला मिळते. संपूर्ण जगात आपला एकमेव देश आहे जिथे विविध धर्माचे लोक आजच्या काळात एकोप्याने एकत्र राहतात. देशात काही थोड्या अंतरावर भाषेत, संस्कृतीत बदल जाणवतो. भारतीय संस्कृतीत नामकरण विधीला प्रचंड महत्त्व आहे. नवीन जन्म झालेल्या बाळाच्या आई वडिलांना नेहमीच असं वाटतं की त्यांच्या बाळाचे नाव हे यूनिक असावे. तुम्ही राहुल, राजेश, आदित्य अशाप्रकारची नावे ऐकली असतील, पण तुम्ही कधी ‘गुगल’ आणि ‘कॉफी’ अशी लोकांची नावे ऐकलीय का..? नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलचं असेल ना, अहो, पण भारतातील एका ठिकाणी लहान मुलांची नावे चक्क ‘गुगल’ आणि ‘कॉफी’ अशीही ठेवण्यात आली आहेत. चला तर पाहूया या नावाची मुले भारतातील कोणत्या ठिकाणी राहतात.

अशी नावे कोण ठेवतात?

आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माचे लोकं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, ज्यांची जीवनशैली त्या त्या प्रदेशानुसार वेगळी असते. त्याचबरोबर प्रत्येकाच्या संस्कृतीचीही स्वतःची वेगळी ओळख असते. पण असाही एक समूह आहे जो स्वतःला हिंदू, मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माशी जोडत नाही. एवढेच नाही तर या जमातीचे लोकं आपल्या मुलांना गुगल आणि कॉफी अशा नावांनी हाक मारतात आणि या जमातीचे नाव ‘हक्की-पिक्की’ आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Crime NEws
Crime News : घरात चिकन बनवण्याचा आग्रह, आई आणि भावांनी गळाच आवळला; पोलिसांना कसा लागला खुनाचा छडा?
doctor lady patient panupuri joke
हास्यतरंग :  सर्व ठीक…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
shortest tenure chief justice of india (1)
देशाचे सर्वात कमी काळासाठीचे सरन्यायाधीश कोण होते माहितीये? फक्त १७ दिवस राहिले पदावर!
वाचा भन्नाट मराठी विनोद (फोटो - ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाईन)
हास्यतरंग :  माझे मित्र…

(हे ही वाचा : अहो आश्चर्यम! देशातील ‘या’ रेल्वे स्थानकावर दररोज प्रवाशी तिकीटं खरेदी करतात, पण प्रवास कोणीच का करत नाहीत?)

हक्की-पिक्की जमातीचे लोकं कुठे राहतात?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, काही ठिकाणी मुलांचे नाव गुगल आणि कॉफी देखील ठेवले जाते. हक्की-पिक्की जमातीचे लोक कर्नाटकात आढळतात. या जमातीचे लोक त्यांच्या मुलांची नावेही वेगळी ठेवतात. हे लोकं आपल्या मुलांची नावे गुगल, कॉफी, एलिझाबेथ, मैसूर अशा प्रकारची अनोखी नावे ठेवतात. बाहेरचा कोणताही व्यक्ती इथे आला की हे नाव ऐकून आश्चर्यचकित होतो. तथापि, येथील मुलं त्यांच्या या नावांमुळे खूप आनंदी आहेत.