Al Hutaib Village: आपण सर्वच बहुधा मागील काही दिवसात कोणाची वाट पाहिली असेल तर तो म्हणजे पाऊस. महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरी मुंबईसारख्या शहरात व राज्यातील अनेक भागात अद्याप पावसाचे निशाणही नाही. हवामान खात्याने सुद्धा चक्रीवादळासह पावसाचा तडाखा बसण्याचे अंदाज वर्तवले होते पण आता अंदमान निकोबारमध्येच पाऊस दाखवलं व्हायला उशीर झाल्याने केरळ व महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागण्यासाठी अजून वाट पाहावी लागू शकते. आपण वाट पाहिली तर एखाद्या दिवशी पाऊस येईल अशी निदान अपेक्षा तरी असते, पण तुम्हाला माहित आहे असंही एक गाव आहे जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार हे गाव यमन या देशाची राजधानी असून याचे नाव ‘अल-हुतैग’ असे आहे. हा उष्णकटिबंधीय प्रदेश असून इथे तापमान अधिक असते. मात्र थंडीच्या महिन्यांमध्ये या भागात सकाळी खूपच थंड वातावरण असते. उन्हाळा व हिवाळा जरी तीव्र स्वरूपात असला तरी पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये मात्र इथे पावसाचा थेंबही पडत नाही, असे सांगितले जाते. हे गाव पृथ्वीच्या पृष्ठापासून ३२०० मीटर उंचीवर आहे. ढगांची निर्मिती साधारण २००० मीटर उंचीवर होऊ लागते त्यामुळे या भागात पाऊस होत नसल्याचे म्हटले जाते.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
thane district water scarcity maharashtra assembly election 2024 election campaigning
तहानलेल्या वस्त्यांमध्ये प्रचारतही पाणी मुद्द्याची टंचाई, जिल्ह्यातील इतर मतदार संघांमध्ये मात्र पाणीप्रश्नावरून राजकारण तापले
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

पण असं असलं तरी तुम्ही वरील आकडेवारीनुसार अंदाज बांधू शकता की या गावात राहणाऱ्यांना काऊ काही आपण स्वर्गात राहतोय असाच आभास होऊ शकतो कारण अनेकदा गावाच्या चौफेर दिशेने ढग दिसून येतात. तुम्ही हरिश्चंद्र गड पाहिला असल्यास तुम्हाला ढग वाहताना दिसणे म्हणजे काय याचा अंदाज असेलच तसे काहीसे वातावरण या गावात १२ महिने दिसून येऊ शकते.

हे ही वाचा<< ट्रेनचे डब्बे घसरून नदीत कोसळल्याने ८०० जणांनी गमावला होता जीव; भारतीय रेल्वेचे ‘हे’ १२ अपघात ठरले सर्वात भीषण

यमनमधील हे अल-हुतैब गाव एका उंच डोंगराच्या टोकावर असल्याने येथील दृश्य हे अत्यंत नयनरम्य असते. म्हणूनच अनेक पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देण्यासाठी येतात. या गावात ग्रामीण व शहरी दोन्ही पद्धतीची घरे दिसून येतात. या गावात बहुतांश लोकसंख्या ‘अल-बोहरा व अल-मुकरमा’ या समुदायाची आहे.