UPI and UPI Wallet difference: UPI ने कॅशलेस इकॉनॉमीला चालना देऊन भारताच्या पेमेंट सिस्टममध्ये परिवर्तन केले आहे. त्याचा सुलभ वापर आणि मोबाइल क्रमांक आणि आधारद्वारे बँक खात्यांशी जोडणे यामुळे हे प्रोडक्ट भारतीय डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकासात एक महत्त्वाची पायरी बनले आहे. UPI हळूहळू पैसे स्वत:कडे बाळगण्याची गरज दूर करत आहे. वापरकर्त्यांसाठी UPI अधिक सुरक्षित आणि सुलभ बनवण्यासाठी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) त्यात सातत्याने सुधारणा करत आहे.

त्या अनुषंगाने, NPCI ने लहान व्यवहारांसाठी UPI वॉलेट सुरू केले, जे केवळ सोयीचे नाही तर अनेक मार्गांनी सुरक्षितदेखील आहे. खरंतर, UPI वापरण्यासाठी व्यक्तीला त्यांचे बँक खाते लिंक करावे लागते. त्याचप्रमाणे UPI वॉलेट वापरण्यासाठी UPI मधून वॉलेटमध्ये पैसे जमा करणे आवश्यक आहे.

हेही वाचा… भारतातील ‘या’ शहराला म्हणतात ‘सिटी ऑफ जॉय’, यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या…

UPI आणि UPI वॉलेटमधील फरक

UPI ही एक पेमेंट सिस्टीम आहे, जी पेटीएम, फोनपे आणि गूगल पे अशा पेमेंट ॲप्सद्वारे वापरली जाते. यामध्ये तुम्हाला तुमचं बॅंक अकाउंट लिंक करावं लागतं आणि यूपीआय थेट तुमच्या बॅंक अकाउंटमधून प्राप्तकर्त्याच्या बॅंक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करते. तर UPI वॉलेट UPI शी लिंक केलेले असते आणि UPI द्वारे त्यात पैसे टाकले जातात आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट करता तेव्हा पैसे तुमच्या वॉलेटमधून थेट दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.

छोट्या पेमेंटसाठी UPI वॉलेटचा फायदा

UPI वॉलेटचा वापर छोट्या व्यवहारांसाठी केला जातो. त्याद्वारे तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त १००० रुपये आणि एका दिवसात १०,००० रुपये ट्रान्सफर करू शकता. हे लक्षात घेता, संभाव्य सायबर धोक्याच्या बाबतीत तुमचे कमीतकमी पैसे धोक्यात असतात. भारतात डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणावर झाले आहे आणि आतापर्यंत यशस्वी झाले आहे, परंतु फसवणूक करणारे ग्राहकांकडून पैसे लुटण्याचे नव नवीन मार्ग शोधतात. UPI वॉलेटचं हे लहान व्हर्जन तुमचे बँक खात्यातील पैसे सुरक्षित ठेवतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, UPI द्वारे व्यक्ती जमा झालेल्या पैशातून थेट व्यवहार करते, तर UPI वॉलेटच्या बाबतीत, UPI मधून वॉलेटमध्ये जमा केलेल्या पैशातून त्याचा वापर केला जातो.

हेही वाचा… ‘या’ भारतीय रेल्वे स्थानकांवरून थेट जाऊ शकता परदेशात; जाणून घ्या सविस्तर माहिती

जलद आणि सोयीस्कर

UPI वॉलेटचे एक महत्त्वाचं फीचर म्हणजे, UPI च्या तुलनेत पैसे पाठवण्यासाठी PIN टाकण्याची गरज नाही. यामुळे पेमेंट जलद आणि सोपे होते आणि किराणा दुकान किंवा चहाच्या स्टॉलसारख्या छोट्या खर्चासाठी उपयुक्त ठरते. UPI वॉलेट एकाच वेळी जास्तीत जास्त १००० रुपये ट्रान्सफर करू शकते. तुमचे बँक खाते UPI वॉलेटशी जोडलेले नाही आणि UPI PIN टाकण्याचीही आवश्यकता नाही, त्यामुळे UPI वॉलेटद्वारे पेमेंट अयशस्वी होण्याची शक्यता कमी होते.