युट्यूब हे सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. याचे मुख्य कारण म्हणजे युजर्सना त्यांचा आवडता कंटेन्ट हवा तेव्हा युट्यूबवर पाहता येतो. पण इतर साईट्स प्रमाणे जेव्हापासून युट्यूब सबस्क्रीप्शन सुरू झाले, तेव्हा त्यातील प्रीमियम व्हिडीओ केवळ फक्त मर्यादित लोकांसाठीच उपलब्ध होऊ लागले. हे प्रीमियम व्हिडीओ पाहण्यासाठी किंवा ऑफलाईन सेव्ह करण्यासाठी सबस्क्रीप्शनची गरज असते.
प्रवासादरम्यान अनेकवेळा नेटवर्कची समस्या येते किंवा अनेकवेळा इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला युट्यूबवरील व्हिडीओ पाहता येत नाहीत. अशावेळी व्हिडीओ ऑफलाईन सेव्ह करून नंतर पाहणे हा पर्याय निवडता येतो. ऑफलाईन सेव्ह केलेले व्हिडीओ इंटरनेट उपलब्ध नसेल तरी पाहता येतात. फोन जर ‘एअरप्लेन मोड’वर असेल तरी ऑफलाईन व्हिडीओ पाहता येतात. ऑफलाईन व्हिडीओ सेव्ह करताना तुम्हाला व्हिडीओची क्वालिटी किती हवी आहे, तसेच यामुळे किती स्टोरेज वापरले जाईल याची निवड करता येते. युट्यूब प्रीमियम व्हिडीओ ऑफलाईन कसे सेव्ह करायचे जाणून घ्या.
आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात
युट्यूब प्रीमियम व्हिडीओ ऑफलाईन सेव्ह करण्यासाठी या स्टेप्स वापरा
- यासाठी तुम्हाला ‘अँड्रॉइड’ किंवा ‘आयओएस’वर आधारित असणाऱ्या फोनमध्ये युट्यूब प्रीमियमचे ॲक्टिव्ह सब्सक्रिप्शन असणे गरजेचे आहे.
- प्रीमियम व्हिडीओ ऑफलाईन सेव्ह करण्यासाठी सब्सक्रिप्शन आवश्यक आहे.
- तुम्हाला जो व्हिडीओ ऑफलाईन सेव्ह करायचा आहे, तो सुरू करा, त्यामध्ये मेन्यु पर्यायावर क्लिक करा.
- त्यामध्ये ‘डाउनलोड व्हिडीओ’ पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला व्हिडीओ क्वालिटी निवडण्यासंदर्भात पर्याय दिसेल, तुम्हाला हवा तो पर्याय निवडा. हे सेटिंगमधून पुन्हा बदलता येते.
- नंतर ‘डाउनलोड’ या निळ्या बटनावर क्लिक करा.
- या स्टेप्स वापरल्यानंतर तुम्हाला हवा तो व्हिडीओ फोन स्टोरेजमध्ये सेव्ह करता येईल.
ऑफलाईन व्हिडीओ कसे पाहायचे
ऑफलाईन व्हिडीओ सेव्ह केल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट उपलब्ध नसेल, तेव्हा युट्यूब सुरू केल्यानंतर तुम्हाला ते ऑफलाईन व्हिडीओ स्क्रीनवर दिसतील. सर्व युट्यूब व्हिडीओ ऑफलाईनला सपोर्ट करत नाहीत, प्रीमियम सबस्क्रिप्शन असुनही काही युट्यूब व्हिडीओवर ऑफलाईन पर्याय उपलब्ध नसतो, याचा अर्थ ते व्हिडीओ ऑफलाईन व्ह्यू सपोर्ट करत नाहीत. तसेच हे ऑफलाईन व्हिडीओ MP4 सारख्या लोकप्रिय मीडिया फॉरमॅटमध्ये नसतात, त्यामुळे हे व्हिडीओ फोन गॅलरीमध्ये नाही तर फक्त युट्यूबवरच पाहता येतात.