आजकाल पैशांचे व्यवहार जास्त करून ऑनलाईन केले जातात. त्यामुळे पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी अनेक अ‍ॅप उपलब्ध झाले आहेत. पण हे सर्व अ‍ॅप वापरण्यासाठी बँक खाते आवश्यक असणं गरजेचं आहे. तरच ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण केली जाऊ शकते. पण, आता तुम्ही यूपीआय (Unified Payment Interface) वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन फीचर सुरू केलं आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने UPI Circle नावाचं नवं फीचर लाँच केलं आहे; जे तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा मित्रांना त्यांच्या बँक खात्याला यूपीआय लिंक केल्याशिवाय तुमच्या बँक खात्यातून यूपीआय ट्रांजेक्शन ( UPI transactions ) करण्यासाठी अधिकृत परवानगी देत आहे. या फीचर अंतर्गत तुम्ही व्यवहार मर्यादा देखील सेट करू शकता. त्यामुळे तुमच्या बँक खात्याची सुरक्षा वाढते.

99 crore RTE fee refund, RTE, refund ,
ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How To Use Super Coins For Free OTT Subscription
Flipkart: फ्लिपकार्टवरून मोफत OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस
sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
aishwarya narkar gives tips for couple to save money
“घर घ्यायचं ठरलं तेव्हा, वर्षाला २ लाख…”, संसारात पैशांची बचत कशी करावी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य

हेही वाचा – देशाचे सर्वात कमी काळासाठीचे सरन्यायाधीश कोण होते माहितीये? फक्त १७ दिवस राहिले पदावर!

UPI Circle अशा व्यक्तींसाठी उपयोगी आहे, ज्यांच्याकडे स्वतःचे बँक खाते नाही किंवा फक्त एक बँक खाते वापरत आहेत. या माध्यमातून तुम्ही ज्येष्ठ नागरिक, मुलं, जोडीदार किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना UPI द्वारे व्यवहार करण्याची सुविधा देऊ शकता. या अंतर्गत, एक प्राथमिक वापरकर्ता जास्तीत जास्त पाच सदस्यांना UPI व्यवहार करण्यासाठी अधिकृत करू शकतो.

हेही वाचा – मार्गेरिटा पिझ्झाच्या नावाचं इटलीच्या राणीशी आहे खास कनेक्शन, वाचा १३५ वर्षांपूर्वीची रंजक गोष्ट

UPI Circle चा वापर कसा करायचा? ( How To Use UPI Circle )

UPI Circle
UPI Circle

BHIM अ‍ॅप उघडा आणि UPI Circle पर्याय निवडला. त्यानंतर कुटुंबातील सदस्याला जोडण्यासाठी Add Family or Friends वर क्लिक करा. मग जोडणाऱ्या सदस्याचा QR कोड स्कॅन करू शकता किंवा UPI आयडी टाकू शकता.

हेही वाचा – आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद किंवा कायमस्वरुपी Delete कसं करायचं? ‘ही’ सोपी प्रक्रिया जाणून घ्या…

UPI आयडी टाकल्यानंतर Add to My UPI Circle क्लिक करा. त्यानंतर जोडणाऱ्या व्यक्तींचा फोन नंबर नोंदवा. मग spend with limits (निर्धारित मर्यादेत व्यवहारांसाठी) किंवा approve every payment (प्रत्येक व्यवहारासाठी तुमची मंजूरी) यामधील एक पर्याय निवडा. ही मर्यादा सेट केल्यानंतर, दुसरा वापरकर्ता जोडण्यासाठी तुमच्या UPI पिनसह पुष्टी करा. अशाप्रकारे कुटुंबातील सदस्यांना UPI Circleमध्ये जोडू शकता.

Story img Loader