Vande Bharat Ticket Cancellation Charges : वंदे भारत ट्रेनचे आकर्षण अनेक प्रवाशांना आहे. सामान्य ट्रेनपेक्षा या ट्रेनमध्ये अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवाशांना प्रवास करणे सोईस्कर वाटते. पण, वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी तुम्ही तिकीट काढले आणि आयत्या वेळी ते तुम्हाला रद्द करावे लागले , तर तिकिटाच्या शुल्कातून रद्दीकरणासाठी किती रक्कम कापली जाते ? (Vande Bharat Ticket Cancellation Charges) याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? नाही… तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्याही कारणास्तव तुम्ही शेवटच्या क्षणी तुमचे रेल्वे तिकीट रद्द करीत असल्यास, भारतीय रेल्वे प्रशासन काही रक्कम त्यातून कापून घेईल. खासकरून तुम्ही ‘कन्फर्म’, ‘आरएसी’ किंवा ‘वेटिंग’ ट्रेनचे तिकीट रद्द केल्यातेस काही रक्कम कापली जाईल. पण, तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसारही ही रक्कम बदलतात. त्याशिवाय भारतीय रेल्वेचे तिकीट रद्द करण्याचे शुल्कदेखील एसी फर्स्ट, एसी-चेअर कार, सेकंड क्लास इत्यादी कोणत्या वर्गाचे ते तिकीट आहे यावर अवलंबून असतो.

वंदे भारत तिकीट रद्दीकरणाचे शुल्क तिकिटाच्या क्लास (वर्गावर) आणि ट्रेनच्या सुटण्याआधी किती वेळ शिल्लक आहे यावर अवलंबून असते (Vande Bharat Ticket Cancellation Charges) :

सुरुवातीला हे जाणून घेऊ की, वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी मध्यम अंतराची सुपरफास्ट एक्स्प्रेस सेवा आहे. ही एक आरक्षित, वातानुकूलित सेवा आहे, जी शहरे एकमेकांपासून ८०० किमी (५०० मैल)पेक्षा कमी अंतरावर आहेत तिथे पोहोचण्यासाठी १० तासांपेक्षा कमी वेळ घेते आणि प्रवास करताना अनेक सेवासुद्धा पुरवते. एक्स्प्रेसमध्ये आठ किंवा १६ कोच असलेल्या सेल्फ-प्रोपेलिंग इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट्स (EMU) आहेत. ट्रेनसेट चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीने डिझाईन आणि तयार केले आहेत. २०१८ मध्ये लाँच करण्यात आलेल्या ट्रेन्सेट्सने चाचण्यांमध्ये ही गाडी १८३ किमी/तास (११४ मैल/तास) या सेमी-हाय स्पीडपर्यंत पोहोचली आणि १८० किमी/तास (११० मैल/तास)चा लक्ष्य चाचणी वेग ओलांडला. पण, वंदे भारत एक्स्प्रेसचा चालू कार्यरत वेग १६० किमी/तास (९९ मैल/तास) आहे.

हेही वाचा…How To Apply For Personal Loan : पर्सनल लोनसाठी घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज; काही तासांत अकाउंटमध्ये पैसे होतील जमा

‘वंदे भारत’चे तिकीट रद्दीकरण शुल्क तपासा (Vande Bharat Ticket Cancellation Charges) :

१. तुम्ही ४८ तासांपूर्वी तुमचे तिकीट रद्द करीत असल्यास, प्रत्येक प्रवाशाकडून एक ठराविक फ्लॅट कॅन्सलेशन (flat cancellation ) चार्ज आकारला जातो.

एसी फर्स्ट क्लास / एक्झिक्युटिव्ह क्लास : २४० रुपये.

२. जर तुम्ही प्रवासाच्या ४८ ते १२ तास आधी तिकीट रद्द करीत असाल, तर तिकिटाच्या २५ टक्के रक्कम वजा केली जाते. त्याचबरोबर फ्लॅट कॅन्सलेशन चार्जसुद्धा आकारला जातो.

३. जर तुम्ही प्रवासाच्या १२ ते ४ तास आधी तिकीट रद्द करीत असाल, तर तिकिटाच्या रकमेमधील एकूण ५० टक्के रक्कम वजा केली जाते. तसेच, फ्लॅट कॅन्सलेशन चार्जसुद्धा आकारला जातो.

४. चार्ट तयार केल्यानंतर ई-तिकीट रद्द केले जाऊ शकत नाही. पण, टीडीआर ऑनलाइन दाखल केला जाऊ शकतो

५. तुमच्याकडे आरएसी किंवा वेटिंग लिस्ट तिकीट असल्यास तुम्ही ३० मिनिटांपूर्वी ते रद्द करू शकता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat ticket cancellation charges based on the timing of ticket cancellation also dependent on ticket type asp