World’s Most Vegetarian-Friendly Countries : जगभरात मांसाहारापेक्षा शाकाहारी जेवण आवडीने खाणाऱ्यांची संख्या वाढतेय. विशेषत: भारतात अनेक लोक शाहाकारी पदार्थ आवडीने खातात. याचे कारण म्हणजे शाकाहारी जेवण आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण, जगात असे काही देशही आहेत जिथे मांसाहार खूप लोकप्रिय आहे. पण, करोना महामारीपासून अनेकांनी आरोग्याच्या दृष्टीने मांसाहारापेक्षा शाकाहारी जेवणाला पसंती दिली आहे. जे लोक मांस किंवा मांस-आधारित अन्नपदार्थ खात नाहीत, त्यांना शाकाहारी असे म्हणतात. पण, जगात असे काही देश आहेत जिथे सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात. असे देश कोणते जाणून घेऊ….
जगातील सर्वाधिक शाकाहारी लोकांचे शहर
जगात काही निवडक देश आहेत, जिथे तुम्हाला शाकाहारी लोकांची संख्या जास्त दिसेल. त्या देशांमध्ये भारताचे नाव प्रथम येते.
भारत
वर्ल्ड ॲटलसच्या मते, भारतातील शाकाहारी लोकांची संख्या ही जगात सर्वाधिक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतातील ३८ टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे. देशात मांसाहार करणाऱ्यांची संख्यादेखील सर्वात कमी आहे. भारतात १८ टक्के लोक निवडक मांस खाणारे आहेत, तर नऊ टक्के शाकाहारी आणि आठ टक्के लोक पेस्केटेरियन आहेत, म्हणजेच ते मासं आणि इतर प्रकारचे सी फूड खातात.
शाकाहाराचा इतिहास २३०० इसवीसनपूर्व भारतात हिंदू धर्माच्या स्थापनेशी जोडलेला आहे. जर आपण भारतातील त्या राज्यांबद्दल बोलायचे झाल्यास जिथे सर्वाधिक शाकाहारी लोक आढळतात, तर त्यापैकी राजस्थान ७४.९%, हरियाणा ६९.२५%, पंजाब ६६.७५% आणि गुजरात ६०.९५% लोक शाकाहारी आहेत. भारतात खाद्यपदार्थांची दुकाने किंवा बाजार वगळता सुमारे १००० शाकाहारी रेस्टॉरंट्स आहेत .
मेक्सिको
२०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड ॲटलसच्या अहवालानुसार, मेक्सिकोमध्ये १९ टक्के लोक शाकाहारी आहेत, ज्यामुळे हा जगातील सर्वाधिक शाकाहारी लोकांचा दुसरा देश बनला आहे. मेक्सिकोमध्ये १५ टक्के पेस्केटेरियन आणि ९ टक्के लोक शाकाहारी आहेत. मेक्सिकन पाककृती शाकाहारी घटकांवर आधारित आहे; ज्यात बीन्स, स्क्वॅश, चॉकलेट, कॉर्न, कॅक्टस, शेंगदाणे, मिरची, चिया आणि राजगिरा यांचा समावेश आहे.
ब्राझील
२०१२ मध्ये ब्राझीलची आठ टक्के लोकसंख्या शाकाहारी होती, ही संख्या आता १४ टक्क्यांवर पोहोचली आहे. हा देश विविध शाकाहारी पाककृतींसाठीदेखील ओळखला जातो, ज्यात चीज पफ, स्ट्यू आणि फळे आणि भाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश आहे. Statista च्या मते, ब्राझीलमध्ये सर्वात जास्त शाकाहारी लोक साओ पाउलोमध्ये राहतात, रिओ दि जनेरियो हे दुसऱ्या क्रमांकाचे शाहाकारी शहर आहे, जिथे ३,२०० पेक्षा जास्त शाकाहारी लोक राहतात.
तैवान
तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर शाकाहारी लोकसंख्या आहे, या देशातील एकूण लोकसंख्येतील १३ टक्के लोक शाकाहारी अन्न खातात. तैवान हे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी शाकाहारासाठी उत्तम शहर असे संंबोधले आहे. तैवानमध्ये अंदाजे ६००० शाकाहारी रेस्टॉरंट्स आहेत. या देशात मोठ्या संख्येने लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. त्यामुळे या देशात शाकाहारी जेवणाची समृद्ध परंपरा आहे. अनेक रेस्टॉरंट्समध्ये शाकाहारी बुफे देतात. तैवान सरकारने शाळा आणि सार्वजनिक संस्थांमध्येही शाकाहारी जेवणाला प्राधान्य दिले आहे. हाय स्पीड रेल्वे, तैवान रेल्वे प्रशासन, प्रमुख तैवान एअरलाइन्स आणि हायवे स्टॉपवर दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये शाकाहारी पदार्थ मिळू शकतात.
Read More Did You Know News : Laptop Charger दोन भागांमध्ये का असतो तुम्हाला माहितेय का? जाणून घ्या खरं कारण….
तैवानमधील शाकाहारी अन्नासाठी देशातील फूड लेबलिंग कायदे जगातील सर्वात कठोर आहेत. येथे खाद्यपदार्थांवर अनेकदा स्वस्तिक चिन्ह डावीकडे तोंड करून चिन्हांकित केले जाते .
इस्रायल
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इस्रायलची सुमारे १३ टक्के लोकसंख्या शाकाहारी आहे, ज्यामध्ये ७.२ टक्के पुरुष आणि ९.७ टक्के स्त्रिया शाकाहारी आहेत. इस्रायलमधील शाकाहाराचे श्रेय यहुदी धर्माला दिले जाते, कारण या धर्मात मांसाहार खाण्यास मनाई असते. जे लोक यहुदी धर्माचे पालन करतात.
इस्रायलमधील लोकांच्या आहारातील हे बदल आरोग्यविषयक चिंता, प्राणी हक्क सक्रियता आणि पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी झाल्याचेही सांगितले जाते. तेल अवीव, ज्याला अनेकदा जगाची शाकाहारी राजधानी म्हणून संबोधले जाते, येथे अनेक शाकाहारी रेस्टॉरंट्स आणि उत्सव आयोजित केले जातात. इस्रायली संरक्षण दल सैनिकांना शाकाहारी जेवणाचा पर्यायही देतात.