Konkan Railway Video: भारतीय रेल्वे ही जगभरातील सर्वात विस्तृत नेटवर्कपैकी एक आहे. हजारो किलोमीटर पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्यातून प्रवास करताना अनेक नेत्रसुखद दृश्य पाहायला मिळतात. काही ठिकाणी मानवी कलाकुसरीने तर काही ठिकाणी निसर्गाच्या किमयेने रेल्वेचे मार्ग सजलेले आहेत. जर आपण स्वतः रेल्वे प्रवास केला असेल तर तुम्हालाही याचा अनुभव आला असेलच. दुसरीकडे सोशल मीडियावर सुद्धा अशा सुंदर प्रवासाचे काही व्हिडीओ शेअर केले जातात. आज रेल्वे मंत्रालयाने स्वतः आपल्याच महाराष्ट्रातील एका अत्यंत सुंदर रेल्वे मार्गाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेला व्हिडीओ हा रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी येथील आहे. रणपत धबधब्यातून ट्रेन प्रवास करत असतानाचा हा व्हिडीओ सहज अंगावर रोमांच आणतो. हा व्हिडीओ पाहून कोकणात गावी जाताना ट्रेन नेहमी फुल्ल का असतात याचाही अंदाज तुम्ही लावू शकता. अर्थात एवढं सौंदर्य पाहायला मिळणार असेल तर कोण अशी संधी दवडेल, बरोबर ना? तुम्ही व्हिडिओमध्ये आवाज नीट ऐकलात तर तुमच्या लक्षात येईल की धबधब्याच्या अगदी जवळून ही ट्रेन प्रवास करते त्यामुळे निसर्गाचे ही जादुई रूप अजुनच मोहक दिसते.

Video: धबधब्यातुन जाणारी कोकणकन्या

हे ही वाचा<< IND vs AUS सामन्यातून आनंद महिंद्रांना महिलेने चक्क निघून जा का सांगितलं? महिंद्रा म्हणतात, “मला शिक्षा…”

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून प्रचंड व्हायरल होत आहे. १ लाखाहुन अधिक व्ह्यूजसह सध्या या व्हिडीओची प्रवाशांमध्ये चर्चा आहे. दुसरीकडे याच ट्वीटखाली काहींनी ट्रेनचा प्रवास तर सुंदर आहे ट्रेनच्या आतमध्ये जो कचरा होतोय त्यावर उत्तर शोधा. तसेच ट्रेन उशिराने धावतायत त्यावर उपाय करा अशासूचना ही रेल्वे मंत्रालयाकडे केल्या आहेत.