Cricket Ball Making Process: भारतात सध्या आयपीएलमय वातावरण आहे पण एरवी सुद्धा जगाच्या तुलनेत भारतीयांचे क्रिकेट प्रेम विशेष आहे असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही. असं म्हणतात, भारतातील गल्लोगल्ली सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर बनण्याची स्वप्न घेऊन लाखो मुलं जगत असतात. कालानुरूप या क्रिकेटच्या स्वरूपात अनेक बदल होत गेले. अगदी प्रत्येक पैलू वेळेनुसार मॉडर्न व सोयीस्कर होत गेला. क्रिकेटचा चेंडू सुद्धा ३०० वर्षात खूप बदलल्याचे दिसून येते. सुरुवातीला काही जण कापड किंवा लोकरीचा गोळा घेऊन चेंडू म्हणून वापरायचे तर आता कॉर्क किंवा चामड्याने बनलेला चेंडू क्रिकेटमध्ये वापरला जातो. आपण आजवर आयुष्यात प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर कित्येक सामने पाहिले असतील पण हा क्रिकेटचा बॉल नेमका बनतो कसा हे तुम्हाला माहित आहे का?

क्रिकेटमध्ये वापरला जाणारा सीझन बॉल म्हणजेच लेदर वापरून बनवलेला बॉल हा जवळपास १६० ग्राम वजनाचा असतो. देशातील बहुतांश क्रिकेटची सामग्री बनवण्याचे कारखाने उत्तरप्रदेश मधील मेरठ व पंजाब मधील जालंधरमध्ये आहेत. हे बॉल बनवण्यासाठी मशीनचा वापर केला जातोच पण त्यातही कामगारांची कलाकुसर विशेष ठरते. याचा एक व्हिडीओ आज आपण पाहणार आहोत.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार

क्रिकेटचा बॉल कसा बनतो? (How Cricket Ball Is Made?)

क्रिकेटचा बॉल बनवण्यासाठी सर्वात आधी कॉर्कमधून चेंडूच्या आकाराचा साचा बनवला जातो. कॉर्क हे सोप्या भाषेत झाडाच्या खोडाचे बारीक सालीसारखे व्हर्जन आहे. यासाठी ओक झाडाचा वापर केला जातो. या साच्यात गोलाकार चेंडू बनवल्यावर यावर लेदरच्या थर जोडला जातो. यासाठी आधी लेदर नीट सुकवून चेंडूच्या आकारानुसार कापून घेतले जाते.

हे ही वाचा<< भोपळी मिरचीच्या तळाला किती टोकं आहेत यावरून ठरतो गोडवा; एका नजरेत कशी कराल योग्य निवड?

ही प्रक्रिया पूर्ण होण्याआधी चेंडूला अन्यही स्टेप्स पार कराव्या लागतात. यामध्ये चेंडूचा आकार व मोजमाप तपासले जाते, लेदरचा लेयर चढवल्यावर या चेंडूला हाताने शिवले जाते. चेंडू वापरासाठी निवडला जाणार की नाही हे या शिलाईवरच अवलंबून असते. जर बॉल तपासणीत १४०० पौंड वजन सहन करून शकला तर त्याची निवड होते. मात्र जर या वजनाने बॉलचा आकार बदलला तर त्याला रिजेक्ट केले जाते. शेवटच्या टप्प्यात या चेंडूला पॉलिश करून यावर स्टॅम्प लावला जातो व मग मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो.