Glowing Beach Kokan: कोकणाला स्वर्ग म्हणतात, का म्हणतात याची उदाहरणे आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहिली आहेत. अनेक युट्युबर्स कोकणाचा स्वर्गमय सुंदर नजारा सोशल मीडियावर दाखवतात. असाच एक कोकणप्रेमी प्रसाद गावडे याने नेटकऱ्यांना एका चमचमत्या समुद्राची ऑनलाईन सफर करून दिली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, हिवाळ्यात कोकणातील एका निर्जन समुद्र किनारी लाटा चमचमताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर जेव्हा प्रसाद ते पाणी उचलून ओंजळीत धरतो तेव्हाही पाणी हातात निळ्या रत्नाप्रमाणे चमचमते. युट्युबरने दिलेल्या माहितीनुसार हे पूर्णतः नैसर्गिक असून हा बायो ल्युमिएसीन्सचा प्रभाव आहे.
जेलीफिश बॅक्टरीया प्लॅन्कटोन्स व असे असंख्य जीव बायोकेमिकल लाईट शरीरातून बाहेर फेकतात. हे बायो इल्युमिनेशन डोळ्यांना जरी मोहक दिसत असले तरी अभ्यासकांच्या मते अशा प्रकारच्या प्लॅन्कटोन्सची अनियमित वाढ समुद्री जैव विविधतेसाठी धोकादायक मानली जाते.
कोकणातला चमचमता समुद्र किनारा
दरम्यान, अशा प्रकारचे अन्यही पाच समुद्रकिनारे भारतात आहेत. यात कर्नाटकचा मुत्थु बीच, लक्षद्वीपचे सुवर्ण बेट, गोव्याचा बेथलबथिम समुद्र किनारा, चेन्नईचा तिरुवनमियुर, अंदमानचे हॅवलोचक बेट यांचा समावेश आहे.
हे ही वाचा<< बॉलिवुड, हॉलिवुड, टॉलिवुड मधील ‘वुड’चा अर्थ काय? भारतात विविध भाषांमधील चित्रपटांना काय म्हणतात?
कोकणाच्या शाश्वत विकासासाठी एक पाऊल..
कोकणी रानमाणूस या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून याचा सविस्तर व्हिडीओ आपण युट्युबवरही पाहू शकता. प्रसाद गावडे नामक तरुणाच्या या इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब अकाऊंटवर कोकणातील अनेक नैसर्गिक खजिन्यांची माहिती देण्यात आली आहे. शाश्वत कोकण विकासासाठी शेतकऱ्यांची जुनी मातीची घरे “मांगर Farmstay” प्रमाणे पर्यटनासाठी विकसित करून प्रत्येक शेतकऱ्याचे स्वतःचे कृषी पर्यटन केंद्र उभे करायला मदत करण्याचे काम या तरुणाने आपल्या टीमसह आरंभले आहे.