World Smallest Village: जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर कोणतं? असे प्रश्न विचारले तर तुम्हाला कदाचित उत्तरं माहीत असतील. पण जगातील सर्वात लहान गाव कोणतं, हे तुम्हाला माहीत आहे का? जगातील सर्वात लहान गावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गावात फक्त एकच रहिवासी आहे, तरीही इथे बार, लायब्ररी अशा सर्व सुविधा आहेत.
जगात एकीकडे अनेक मोठ्या शहरांमध्ये गर्दी वाढत आहे, तर दुसरीकडे एक असं गाव आहे जिथे फक्त एकच व्यक्ती राहते. या गावात एकच वृद्ध महिला राहते. या महिलेचं वय ८५ वर्षांहून जास्त आहे, तरी त्या गावाची देखभाल करण्यापासून सगळी कामं एकटी करते. गावं म्हटलं की जवळपास ८०-१०० कुटुंब तरी असतात, पण हे गाव अपवाद आहे. हे गाव अमेरिकेत आहे. या गावाचे नाव मोनोवी (Monowi, USA) आहे.
भारतात पहिला कॉल कोणी कोणाला केला होता? एक मिनिट बोलण्यासाठी यायचा ‘इतका’ खर्च
२० वर्षांपासून गावात एकच रहिवासी
२०१० च्या जनगणनेतील माहितीनुसार, जगातील सर्वात लहान गावात फक्त एकच महिला राहते. एल्सी आयलर असं या एकमेव महिलेचं नाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, त्यावेळी एल्सी ८६ वर्षांच्या होत्या. २००४ पासून मोनोवीमध्ये एल्सी एकट्या राहतात. एल्सी गावातील सर्व जबाबदाऱ्या स्वतः सांभाळतात. अगदी गावातील प्रशासकीय कामांपासून ते बारटेंडर व ग्रंथपाल ही सगळी कामं त्या स्वतः करतात. यासंदर्भात न्यूज १८ ने वृत्त दिलं आहे.
पाहा गावाचा व्हिडीओ –
एकेकाळी राहायचे १३० लोक
मोनोवी गाव अंदाजे ५४ हेक्टर परिसरात पसरलं आहे. मोनोवी गावात जवळपास १०० वर्षांपूर्वी म्हणजेच १९३० मध्ये १२३ लोक राहायचे. पण त्या नंतरच्या काही दशकांमध्ये लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली. १९८० सालापर्यंत या गावात १८ लोक उरले. २००० मध्ये या गावात फक्त दोघेजण उरले. ते म्हणजे एल्सी आयलर व त्यांचे पती रुडी. रुडी यांचं २००४ मध्ये निधन झालं. तेव्हापासून म्हणजेच मागच्या २० वर्षांपासून या गावात एल्सी एकट्याच राहत आहेत.
गावाला भेट द्यायला येतात पर्यटक
खास गोष्ट अशी की या गावात एल्सी एकट्याच राहत असल्या तरी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे भेट द्यायला येतात. ते एल्सी यांना त्यांच्या दैनंदिन कामात मदत करतात व मोनोवीमध्ये शांततेत वेळ घालवतात. ऐल्सी या पर्यटकांचं आदरातिथ्य करतात.