Indian Railway Tracks Change: जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क भारताचे मानले जाते. भारतात दर सेकंदाला शेकडो गाड्या रुळांवर धावतात आणि आजच्या काळात त्या अतिशय चांगल्या तांत्रिक यंत्रणेद्वारे चालवल्या जात आहेत. तुम्हीही भारतीय रेल्वेने कधी ना कधी प्रवास केलाच असेल. रेल्वे स्थानकावर अनेक ट्रॅक असल्याचे तुम्ही पाहिले असतील. ट्रेन एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर कशी पोहोचते? सहसा कार/ बाईक किंवा अगदी सायकलने प्रवास करतानाही स्टेअरिंगने वाटेत वळण घेतले जाते पण ट्रेनला तर असं कुठलंच स्टेअरिंग नसतं. मग नेमकी ट्रेन रूळ कसा बदलते. आता याच प्रश्नावर भारतीय रेल्वेने स्वतः व्हिडीओ शेअर करून उत्तर दिले आहे.
सर्वात आधी रेल्वेचा ट्रॅक बदलण्याची प्रक्रिया पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे जिथे ट्रेनला ट्रॅक बदलावा लागतो तिथे आधीच्या ट्रॅकवर आणखी २ ट्रॅक जोडले जातात. दुसरं म्हणजे, ट्रेनची चाके आतून ट्रॅक धरून फिरतात. एक दोन नव्हे तर त्याहून जास्त ट्रॅक एकाच ठिकाणी तुम्ही पाहिले असतील. काही ट्रॅक अप आणि डाऊन मार्गाचे असतात, त्यामध्ये तिसरा ट्रॅक २ ट्रॅकच्या मधोमध फिरवला जातो. याला इंटरलॉकिंग म्हणतात.
भारतीय रेल्वेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, रेल्वेचा लॉक चावीसारखा एक ट्रॅक असतो, जो बाजूला चिकटवला जातो आणि यामुळे ट्रॅकची दिशा बदलते आणि ट्रेन दुसऱ्या बाजूला वळते. म्हणजे हा एक प्रकारे अॅडजस्टेबल ट्रॅक आहे, जो ट्रेनला दिशा देण्याचे काम करतो.
ट्रॅक बदलण्यासाठी ट्रॅकमध्ये अॅडजस्टेबल ट्रॅक असतो, मात्र तो ट्रेनच्या रुटनुसार बदलावा लागतो. पूर्वी हे काम रेल्वे कर्मचारी करत असत आणि ते दिवसभर हाताने बदलत असत. मात्र, आता असे होत नाही. आजच्या काळात हे काम यंत्राद्वारे केले जाते. सिग्नल आणि मार्गानुसार यंत्र ते जुळवून घेते आणि त्यानुसार ट्रेनला दिशा मिळते आणि ती वळते.
Video: ट्रेन स्टेअरिंगशिवाय ट्रॅक कसा बदलते?
हे ही वाचा<< ‘या’ भारतीय रेल्वेला देशात मिळते सर्वोच्च प्राधान्य! राजधानी, शताब्दी अगदी वंदे भारतही थांबवून पुढे धावते ही ट्रेन
आजही काही मोठमोठ्या स्टेशन्सच्या आधी तुम्हाला पिवळ्या रंगाचे केबिन दिसेल. इंटरलॉकिंगच्या ठिकाणी एक छोटी मशीन बसवली जाते, जी कंट्रोल रूममध्ये बसलेल्या व्यक्तीच्या कमांडनुसार ट्रॅक लॉक किंवा अनलॉक होते.